ETV Bharat / bharat

50 लाख खर्चून तरुण झाली तरुणी, मित्रानं लग्नाला नकार देताच पेटवली कार - gender change boy to girl

Two youths arrested : कानपूरमध्ये कार जाळल्याचं सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झालं होतं. पोलिसांनी कार पेटवणाऱ्या दोन आरोपींना अटक केल्याचं समोर आलंय. या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली.

दोन तरुणांची अजब 'प्रेमकथा'; 50 लाख खर्चून एक बनला मुलगी, मात्र दुसऱ्याचा लग्नाला नकार, रागातून पेटवली कार

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 6, 2024, 10:05 AM IST

सीसीटीव्ही

कानपूर (उत्तर प्रदेश) Two youths arrested : कानपूरच्या चकेरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी रात्री उशिरा एका तरुणानं रेस्टॉरंट चालकाच्या घराबाहेर पार्किंगमध्ये उभ्या असलेली कार पेटवून दिली. घटनेनंतर आरोपी तरुण घटनास्थळावरून फरार झाला. या संपूर्ण घटनेचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलंय. यानंतर मंगळवारी पोलिसांच्या पथकानं आणि ऑपरेशन त्रिनेत्राच्या मदतीनं ही घटना घडवून आणणाऱ्या दोन आरोपींना अटक केलीय.

अटक केलेल्या दोन्ही आरोपींविरुद्ध पोलीस पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत. चौकशीदरम्यान पोलिसांना हे संपूर्ण प्रकरण दोन तरुणांच्या प्रेमप्रकरणांशी संबंधित असल्याचं समोर आलंय. एका तरुणानं 50 लाख रुपये खर्च करुन त्याचं लिंग बदललं होतं. मात्र, त्याला मित्रानं लग्नास नकार दिला. त्यामुळे त्यानं कार पेटविली. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा प्रत्येक पैलूचा गांभीर्यानं तपास करत आहेत.

काय आहे संपूर्ण प्रकरण : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चकेरी पोलीस स्टेशन हद्दीतील श्यामनगर इथं राहणाऱ्या तरुणाची इंदौरमधील तरुणाशी इंस्टाग्रामवरुन मैत्री झाली होती. दोघांमध्ये संवाद सुरू राहिला. त्यांच्या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झाले. या तरुणानं 2022 मध्ये त्याचं लिंग बदललं होतं. दोघांमध्ये काही कारणावरुन वाद झाला. यावर श्यामनगर इथं राहणाऱ्या तरुणानं लग्नास नकार दिला. याचा बदला घेण्यासाठी तरुणानं त्याच्या मित्रासह कार आणि घराला आग लावण्याचा कट रचला होता. ही घटना घडवण्यासाठी दोघांनी स्कूटी भाड्यानं घेतली. त्यात पेट्रोल भरुन इंदौरच्या तरुणाचं घर गाठलं. त्यांनी आधी पाईपच्या साहाय्यानं कारवर पेट्रोल सोडलं. त्यानंतर तरुणाच्या मित्रानं त्याच्या उभ्या असलेल्या कारवर पेट्रोल टाकून फिल्मी स्टाईलनं पेटवून दिली. घटनेनंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. पोलिसांनी मंगळवारी दोन्ही आरोपींना अटक केलीय.

घटनेचा सीसीटीव्ही व्हायरल : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चकेरी पोलीस स्टेशन परिसरातील श्यामनगर येथे राहणारे अनुप शुक्ला हे कॅफे ऑपरेटर आहेत. त्यांची कार घराबाहेर पार्किंगमध्ये पार्क केली होती. तेवढ्यात अचानक खूप आवाज झाला. शेजारचे लोक जोरजोरात ओरडू लागले. त्याचवेळी आवाज ऐकून अनुप बाहेर आले. तेव्हा त्यांची कार जळत असल्याचं दिसलं. या संपूर्ण घटनेचं सीसीटीव्ही फुटेज गेल्या सोमवारी विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झालं. व्हायरल व्हिडिओमध्ये एक तरुण फिल्मी स्टाईलमध्ये मास्क घालून घरात शिरताना दिसत आहे. त्यानं आधी कारवर पेट्रोल ओतलं. त्यानंतर कारला पेटवून दिलं. काही वेळातच कारनं पेट घेतला. हा प्रकार घरी उपस्थित असलेल्या लोकांना कळताच त्यांनी कारवर पाणी टाकून आग आटोक्यात आणली. त्यानंतर अनुप शुक्ला यांनी पोलिसांना या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली.

कशी झाली ओळख : डीसीपी पूर्व श्रवण कुमार सिंह यांनी सांगितलं की, व्हायरल व्हिडिओ पोलिसांनी दखल घेतली. या संपूर्ण प्रकरणी पोलिसांनी पीडित अनुप शुक्ला यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला. मंगळवारी पोलिसांनी आरोपी आणि त्याचा मित्राला अटक केली. त्यातील एका आरोपीवर मध्य प्रदेशात 70 गुन्हे दाखल आहेत. या संपूर्ण घटनेचा उलगडा करण्यात टेहळणी पथक, पोलीस स्टेशन आणि ऑपरेशन त्रिनेत्र यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ऑपरेशन त्रिनेत्रच्या मदतीनं पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या मोबाईल नंबरचं लोकेशन ट्रेस करुन दोन्ही आरोपींना फाजलगंज बसस्थानकावरुन अटक केली. अटक केलेल्या दोन्ही आरोपींविरुद्ध पोलीस पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

हेही वाचा :

  1. काय सांगता! सनी लिओनीला व्हायचंय पोलीस? हॉल तिकीट पाहून अधिकारीही चक्रावले

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.