ETV Bharat / bharat

बिहारमध्ये गुंडाराज! घरात घुसून माजी मंत्री मुकेश सहनी यांच्या वडिलांची हत्या - Mukesh Sahani Father Murder

Mukesh Sahani Father Killed : बिहारमधील दरभंगा येथून धक्कादायक बातमी समोर आलीय. विकासशील इंसान पार्टी (VIP) चे प्रमुख आणि बिहार सरकारचे माजी मंत्री मुकेश सहनी यांचे वडील जीतन सहनी यांची हत्या करण्यात आलीय. त्यांचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला. या घटनेमुळं राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

former bihar minister mukesh sahani father murdered in darbhanga
बिहारचे माजी मंत्री मुकेश सहनी यांच्या वडिलांची हत्या (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 16, 2024, 9:54 AM IST

Updated : Jul 16, 2024, 2:27 PM IST

दरभंगा Mukesh Sahani Father Killed : माजी मंत्री आणि विकासशील इंसान पक्षाचे अध्यक्ष मुकेश सहनी यांच्या वडिलांची हत्या करण्यात आलीय. दरभंगा येथील त्यांच्या घरात ही घटना घडली. मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत सापडला आहे. एसएसपींनी या घटनेला दुजोरा दिलाय. तर मिळालेल्या माहितीनुसार, मुकेश सहनी हे सध्या मुंबईत आहेत.

एसएसपी काय म्हणाले? : दरभंगाचे एसएसपी जगुनाथ रेड्डी यांनी या घटनेची पुष्टी केली. माजी मंत्री मुकेश सहनी यांचं घर दरभंगाच्या सुपौल बाजारच्या अफझला पंचायतमध्ये आहे. त्यांचे वडील जीतन सहनी यांची घरातच निर्घृण हत्या करण्यात आली. धारदार शस्त्रानं वार करून हत्या करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताचं पोलिसांचं पथक घटनास्थळी रवाना झालंय.

कोण आहेत मुकेश सहनी? : बिहारच्या राजकारणात मुकेश सहनी यांचं अत्यंत कमी कालावधीत महत्त्व वाढलं आहे. ते विकासशील इंसान पार्टीचे अध्यक्ष आहेत. 2020 च्या निवडणुकीनंतर बिहारमध्ये नितीश कुमार यांचं सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांना पशुसंवर्धन आणि मत्स्यव्यवसाय खात्याचे मंत्री करण्यात आलं. मात्र, नंतर भाजपासोबत मतभेद झाल्यानंतर ते एनडीएपासून वेगळे झाले. ते बिहार विधान परिषदेचे सदस्यही राहिलेत. निषाद समाजातून आलेले मुकेश सहनी स्वतःला 'सन ऑफ मल्ल' म्हणतात. राज्यात मल्ल (निषाद) समाज 12 टक्के आहे.

हेही वाचा -

  1. बिहारमध्ये एकतर्फी प्रेमातून रक्तरंजीत खेळ! छठपूजेवरून परतणाऱ्या 6 जणांवर गोळीबार, तिघांचा मृत्यू
  2. Bihar Crime: मागासवर्गीय महिलेला कपडे काढून मारहाण, त्यानंतर... बिहारमध्ये संतापाची लाट

Last Updated : Jul 16, 2024, 2:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.