नवी दिल्ली Delhi Liquor Policy Scam : दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री तथा आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांना दिल्ली दारू घोटाळ्यात अटक करण्यात आली आहे. त्यांनी जामिनासाठी दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली होती. त्यानंतर मात्र मनीष सिसोदिया यांनी जामीन नाकारणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात फेरविचार याचिका दाखल केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयानं ती देखील फेटाळून लावत मनीष सिसोदिया यांना मोठा धक्का दिला आहे. सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या नेतृत्वातील न्यायमूर्ती संजीव खन्ना, न्यायमूर्ती बी आर गवई आणि न्यायमूर्ती एस व्ही एन भट्टी यांच्या खंडपीठानं ही फेरविचार याचिका फेटाळली आहे.
मनीष सिसोदिया यांना मोठा धक्का : दिल्ली दारू घोटाळा प्रकरणात दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री तथा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे विश्वासू सहकारी मनीष सिसोदिया यांना अटक करण्यात आलं आहे. मनीष सिसोदिया यांनी सर्वोच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयानं तो फेटाळून लावला. त्यामुळे मनीष सिसोदिया यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या जामीन नाकारणाऱ्या आदेशाविरोधात पुन्हा सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. यावेळी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाला आव्हान दिलं. मात्र सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या नेतृत्वात न्यायमूर्ती संजीव खन्ना, न्यायमूर्ती बी आर गवई आणि न्यायमूर्ती एस व्ही एन भट्टी यांनी मनीष सिसोदिया यांनी दाखल केलेली याचिका फेटाळून लावली. त्यामुळे मनीष सिसोदियांना सर्वोच्च न्यायालयाचा हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. "सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली फेरविचार याचिका फेटाळण्यात आली आहे. आम्ही याचिका आणि संबंधित कागदपत्रं पाहिली आहेत. आमच्या मते, रूपा अशोक हुर्रा विरुद्ध अशोक हुर्रा या प्रकरणातील सूचित केलेल्या पॅरामीटर्समध्ये हे प्रकरण येत नाही," असं खंडपीठानं नमूद केलं.
खुल्या न्यायालयात नाकारली सुनावणी : मनीष सिसोदिया यांनी फेरविचार याचिका दाखल केल्यानंतर त्यांना दिल्ली दारू घोटाळ्यात जामीन मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र सर्वोच्च न्यायालयानं त्यांना मोठा धक्का दिला." फेरविचार याचिका फेटाळण्यात आली आहे. प्रलंबित काही अर्ज असल्यास ते निकाली काढा," असे आदेश खडपीठानं दिलेले आहेत. मागील वर्षी डिसेंबरमध्ये सर्वोच्च न्यायालयानं मनीष सिसोदिया यांना जामीन नाकारला होता. त्या निर्णयाविरोधात मनीष सिसोदिया यांनी फेरविचार याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती एस व्ही एन भाटी यांच्या खंडपीठानं खुल्या न्यायालयात सुनावणी नाकारली आहे. "फेरविचार याचिका दाखल करण्याचे कोणतेही कारण नाही," असं यावेळी खंडपीठानं स्पष्ट केलं.
हेही वाचा :