ETV Bharat / bharat

पुन्हा एकदा गुगल मॅपनं गंडवलं? कुटुंब रात्रभर फिरत होतं जंगलात - GOOGLE MAPS

बिहारमधून गोव्याला निघालेलं कुटुंब गुगल मॅपच्या आधारे मार्गस्थ झालं होतं. मात्र जंगलात नेटवर्क गेल्यानं त्यांचा मार्ग चुकला. वाचा पुढे काय झालं.

जंगलात अडकलेली कार, कुटुंबातील सदस्य आणि पोलीस
जंगलात अडकलेली कार, कुटुंबातील सदस्य आणि पोलीस (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 6, 2024, 7:29 PM IST

बेळगावी (कर्नाटक) : गुगल मॅप लोकेशन फॉलो केल्यानं अनेकजणांना चक्रावल्याचा अनुभव आला असेल. काही दिवसांपूर्वी गुगल मॅप फॉलो केल्यानं उत्तर प्रदेशात तुटक्या पुलावरुन कार कोसळून अपघात झाला होता. त्यात तिघांना जीव गमवावा लागला होता. त्यानंतर गुगलनं आणि स्थानिक पोलिसांनी स्पष्टीकरणही दिलं होतं. आता बिहारचं कुटुंब रात्रभर घनदाट जंगलात अडकल्याची घटना घडलीय. गुगल मॅपच्या आधारे प्रवास करणारं संपूर्ण कुटुंब नेटवर्क गेल्यानं अडचणीत आल होतं. गुगल मॅपचा वापर करून कारनं प्रवास करणाऱ्या बिहारमधील एका कुटुंबाचा बेळगावी जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील भीमगडा वन्यजीव अभयारण्याच्या घनदाट जंगलात रस्ता चुकला आणि संपूर्ण रात्र ते जंगलातच होते. अखेर खानापूर पोलिसांच्या मदतीनं ते वाचले.

बिहारचे राजदास रणजितदास हे कुटुंबासह कारमधून उज्जैनहून गोव्याला जात होते. बुधवारी ते गुगल मॅप वापरून प्रवास करत होते. त्यावेळी मध्यरात्री ते शिरोली ते हेमदगा दरम्यानच्या मुख्य रस्त्यापासून 7-8 किलोमीटर अंतरावर असलेल्या घनदाट जंगलात गेले. तिथं मोबाईल नेटवर्क नव्हतं. अंधारात अडकलेल्या राजदासचं कुटुंब अत्यंत घाबरलं होतं असं पोलिसांनी सांगितलं. रात्री रस्ता सापडत नसल्यानं राजदास आणि संपूर्ण कुटुंबानं रात्र जंगलातच घालवली. यावेळी राजदास यांनी घाबरुन न जाता ते रात्रभर कुटुंबाला धीर देत राहिले. गुरुवारी सकाळी ते जिथे होते तिथून तीन-चार किलोमीटर अंतर पार करुन गेल्यावर त्यांना मोबाईल नेटवर्क मिळालं. त्यानंतर त्यांनी तत्काळ 100 क्रमांकावर फोन करून पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला.

पोलिसांनी सांगितलं की ते अडचणीत होते आणि त्यांना मार्ग सापडत नव्हता. खानापूर पोलीस स्टेशनचे पीआय मंजुनाथ नायक, तसंच एएसआय बडिगेरा, हेड कॉन्स्टेबल जयराम हममनवरा, कॉन्स्टेबल मंजुनाथ मुसली आणि कर्मचाऱ्यांनी तत्काळ कारवाई करत राजदास यांचं लाईव्ह लोकेशनच्या मदतीनं लोकेशन ट्रेस केलं. स्थानिक लोकांच्या मदतीनं त्यांच्याशी संपर्क साधला. तसंच पोलिसांनी नंतर घटनास्थळी पोहोचून त्यांना मुख्य रस्त्यावर नेलं. त्यानंतर ते गोव्याच्या दिशेनं निघाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.