सोलापुरात जनता कर्फ्युला 100 टक्के प्रतिसाद
🎬 Watch Now: Feature Video
सोलापूर - देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सोलापूरकरांनी १०० टक्के जनता कर्फ्यु मध्ये सहभाग नोंदवला आहे. सोलापूर शहरातील मुख्य बाजारपेठ आतर पूर्णतः बंद आहेत. याशिवाय रहिवासी भागातही नागरिकांनी घराच्या बाहेर न जाता घरातच राहणे पसंत केले आहे. कायमस्वरूपी वर्दळीची असलेली अनेक ठिकाणे आज सकाळपासूनच पाऊस पडलेली पाहायला मिळाली. नित्यनियमाने दररोज सकाळी फिरायला किंवा व्यायामाला जाणाऱ्यांनी देखील सकाळी सात वाजेपर्यंत घरी जाण्याला पसंती दिली. सकाळी १० पर्यंत सोलापूर शहर हे १०० टक्के बंद झाले असल्याचे चित्र पाहायला मिळाले. रस्त्यावर प्रसार माध्यमाचे काही प्रतिनिधी आणि पोलिस यांच्या व्यतिरिक्त कोणीही दिसत नव्हते.