INTERVIEW : सचिन वाझे, विनायक शिंदे प्रकरणी माजी वरिष्ठ पोलीस अधिकारी धनराज वंजारींसोबत बातचीत
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई- अँटिलिया इमारतीच्या जवळ सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीतील स्फोटकांच्या संदर्भात सचिन वाझें या अधिकाऱ्याला राष्ट्रीय तपास यंत्रणेने अटक करून वेगळ्या गोष्टीचा खुलासा केला आहे. 2002 घाटकोपर बॉम्ब स्फोटमधील आरोपी ख्वाजा युनूस याच्या पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरणी सचिन वाझे यास मुंबई पोलीस खात्यातून निलंबित करण्यात आले होते. तब्बल 17 वर्षे निलंबित असलेल्या सचिन वाझेला कोरोना संक्रमणाच्या नावाखाली तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी पोलीस खात्यात 2020 मध्ये पुन्हा सामावून घेतले होते. मात्र, गुन्हेगारी कारवाया व खुनाचा आरोप असलेल्या पोलीस अधिकाऱ्याला 17 वर्षानंतर पुन्हा पोलीस सेवेत सामावून घेत असताना अशा पोलीस अधिकाऱ्याची मानसिक स्थिती कशा प्रकारची आहे याची चाचपणी करणे गरजेचे असल्याचे मुंबई पोलीस खात्यातील माजी ज्येष्ठ पोलीस अधिकारी अॅडव्होकेट धनराज वंजारी यांनी सांगितले आहे.