TMC MP Kakoli Ghose eaten brinjal in parliament: खासदार काकोली घोष यांनी लोकसभेत खाल्ले चक्क कच्चे वांगे

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail
नवी दिल्ली - संसदेच्या पावसाळी अधिवेशनात महागाईवरील चर्चेवरून झालेल्या गदारोळानंतर अखेर सोमवारी लोकसभेत या विषयावर चर्चा झाली. दरम्यान, तृणमूल काँग्रेसच्या (TMC) खासदार काकोली घोष दस्तीदार यांनी अनोख्या पद्धतीने महागाईचा विरोध केला. लोकसभेत भाषण करत असताना अचानक कच्चे वांगी खाऊन त्यांनी केंद्र सरकारचा निषेध केला (TMC MP Kakoli Ghose eaten brinjal in parliament). त्या म्हणाल्या की, देशात गॅस सिलिंडरच्या किंमती इतक्या वाढल्या आहेत की शिजवलेल्या भाज्या खाण्याऐवजी कच्च्याच खाव्यात. त्या म्हणाल्या की, मोदी सरकारच्या काळात एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढल्याने भाजी शिजवणे कठीण झाले आहे. त्या म्हणाल्या की, मला ही भाजी कच्ची खावी लागेल कारण एलपीजी सिलेंडरची किंमत चार पटीने वाढली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.