thumbnail

MP News : प्रद्युम्न सिंह तोमर पुन्हा एकदा झाले सिंधियांसमोर नतमस्तक, बघा व्हिडिओ

By

Published : Mar 10, 2023, 5:45 PM IST

ग्वाल्हेर : मध्य प्रदेशचे ऊर्जा मंत्री प्रद्युम्न सिंह तोमर आज पुन्हा एकदा ग्वाल्हेरचे महाराज आणि केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या पूढे नतमस्तक झाले. मात्र, यादरम्यान सिंधिया यांनी नतमस्तक झालेल्या प्रद्युम्न सिंग यांनाही प्रेमाने उचलून मिठी मारली. यादरम्यान मंत्री प्रद्युम्न म्हणाले की, 'या वयातही सिंधिया यांनी धावपटूंसोबत 12 किलोमीटरची शर्यत धावली, मी त्यांना हृदयापासून सलाम करतो की ते ग्वाल्हेरसाठी धावले'. माधवराव सिंधिया यांच्या ७८व्या जयंतीनिमित्त शुक्रवारी ग्वाल्हेरमध्ये मॅरेथॉनच स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये नेत्यांसह अनेकांनी भाग घेतला होता. केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया हे याआधी मनमोहन सिंग सरकारमध्ये केंद्रिय मंत्री होते. त्यांचे वडील माधवराव सिंधिया देखील कॉंग्रेस सरकार मध्ये विजयी उमेदवार होते. 

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.