ETV Bharat / sukhibhava

Holi Fashion Tips : होळीच्या दिवशी पांढऱ्या ड्रेसमध्ये स्टायलिश दिसायचे आहे? तर मग करा 'हे' सेलिब्रिटी लूक - look stylish in white dress on Holi

होळी हा रंगांचा सण आहे. दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो. 2023 मध्ये 7 मार्च मंगळवार रोजी होळीचे दहन आहे. तसेच 8 मार्च बुधवार रोजी धुलिवंदन आहे. धुलिवंदनाच्या दिवशी सगळीकडे आनंदाचे वातावरण असते. साधारणपणे धुलिवंदनाच्या दिवशी पांढरे कपडे घालण्याची परंपरा आहे. अशा परिस्थितीत, पांढर्‍या कपड्यांसह काही नवीन लुक ट्राय करण्यासाठी तुम्ही बॉलिवूड अभिनेत्रींकडून प्रेरणा घेऊ शकता. या सुंदर पोशाखात तुम्ही स्टायलिश तसेच पारंपारिक दिसाल.

Holi Fashion Tips
कतरिना कैफ
author img

By

Published : Feb 7, 2023, 3:30 PM IST

हैदराबाद : होळी, रंग आणि आनंदाचा सण दरवर्षी थाटामाटात साजरा केला जाईल. होळीचा सण खास बनवण्यासाठी अनेकांनी आतापासूनच नियोजन सुरू केले आहे. होळीच्या सेलिब्रेशनसाठी अनेक मुलींनी आधीच ड्रेसची निवड सुरू केली आहे. होळीच्या निमित्ताने तुम्हीही यावेळी स्टायलिश दिसण्याचा विचार करत असाल तर तुम्ही आतापासूनच तयारी करा. तुम्हाला या होळीला सेलिब्रिटी लूक हवा असेल तर तुम्ही या अभिनेत्रींसारखे कपडे परिधान करू शकता.

Holi Fashion Tips
सारा अली खान

सारा अली खान लूक : होळीच्या दिवशी तुम्ही अभिनेत्री सारा अली खानसारखा मोती कलरचा ड्रेस परिधान करू शकता. त्यावर एखादी सुंदर ओढणी कॅरी करू शकता. तसेच साराने त्यावर सुंदर मॅच होणारे कानातले आणि बांगड्या घालू शकता. आता तुमचा सारासारखा होळी लुक तयार आहे. हा सारा ड्रेस होळी पार्टीसाठी योग्य आहे.

Holi Fashion Tips
अनुष्का शर्मा

अनुष्का शर्मा लूक : जर तुम्हाला होळीच्या दिवशी पारंपारिक लूक हवा असेल, तर अनुष्का शर्माप्रमाणे तुम्ही देखील चुडीदार सलवार आणि अनारकली कट कुर्तीसोबत मोठी ओढणी घ्या. यामुळे तुम्हाला रॉयल लुक मिळेल. त्यासोबतच तुम्ही मोठे कानातले घाला. यामुळे तुमच्या लुकमध्ये भर पडेल.

Holi Fashion Tips
कतरिना कैफ

कतरिना कैफ लूक : होळीच्या दिवशी गुलाल खेळण्यासाठी तुम्हाला आरामदायी पोशाख घालायचा असेल तर कतरिना कैफप्रमाणे तुम्ही जीन्स शॉट्स आणि पांढरा टी-शर्ट कॅरी करू शकता. यामध्ये तुम्ही कुल दिसाल आणि तुम्ही फ्री फिल होईल.

होळीचे महत्त्व : हिंदू धर्मात होळीला खूप महत्त्व आहे. होळी हा रंगांचा सण आहे. तो देशभर मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. हिंदू कॅलेंडरनुसार, होळी दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी साजरी केली जाते. तसेच होळीच्या ८ दिवस आधी होलाष्टक येतो. या वेळी मंगळवार 28 फेब्रुवारी 2023 पासून होलाष्टक सुरू होत आहे. तर 7 मार्च 2023, मंगळवार रोजी होळीचे दहन केले जाणार आणि 8 मार्च बुधवार रोजी धुलिवंदन आहे. सनातन धर्मात फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

धूलिवंदन किंवा रंगपंचमी : 2023 मध्ये 8 मार्च बुधवार रोजी धुलिवंदन आहे. या दिवशी लोक वेगवेगळ्या रंगांची होळी खेऴून आनंद साजरा करतात. प्रत्येक राज्यात धुलिवंदन साजरी करण्याची प्रथा वेगवेगळी आहे. या दिवशी लोक एकमेकांना रंग लावून होळीच्या शुभेच्छा देतात. व खाण्यासाठी विविध पदार्थ करतात. महाराष्ट्रात होळी दहनाच्या दिवशी केल्या जाणाऱ्या पुरण पोळीला फार महत्व आहे. तसेच रंगपंचमीच्या दिवशी तयार केल्या जाणारे विशेष तर्री पोहे, पकोडे, चने हे पदार्थ खाण्यास लोकांची पसंती असते.

हेही वाचा : Holi 2023 : 2023 मध्ये कधी आहे होळी ? होलिका दहनाची तारीख, शुभ वेळ आणि पौराणिक कथा जाणून घ्या

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.