मुंबई : सध्या श्रावण महिना सुरू आहे. येणाऱ्या आठवड्यात अनेक उपवास आणि सण येणार आहेत. वरलक्ष्मी व्रत हे त्यापैकीच एक आहे. विवाहित महिलांसाठी या व्रताचे विशेष महत्त्व आहे. दरवर्षी श्रावण शुक्ल पक्षाच्या नवमीला हे व्रत पाळलं जाते. या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते.
माता वरलक्ष्मी देते अखंड सौभाग्य : असे मानले जातं की, देवी लक्ष्मीची योग्य प्रकारे पूजा केल्याने अखंड सौभाग्याचा आशीर्वाद मिळतो. वैवाहिक जीवन आनंदी राहते. आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळते. पुत्रप्राप्ती होते. तसेच कुटुंबाची कीर्ती वाढते. वरलक्ष्मीचे व्रत केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते. या शुभ दिवसापासूनच वैभव लक्ष्मीचे व्रत सुरू करता येते. अनेकजण या दिवशी संकल्प करून वैभव लक्ष्मीचे व्रत सुरू करतात.
या शुभ दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठून आपल्या दोन्ही हातांकडे श्रद्धेने पाहावे. यानंतर, घर पूर्णपणे स्वच्छ करावे. संपूर्ण घर स्वच्छ आणि नीटनेटके ठेवायला हवे. अशी मान्यता आहे की, जिथे स्वच्छता असते, तिथे लक्ष्मी कायम वास करते. संपूर्ण घर व ऑफिसची व्यवस्थित स्वच्छता केली पाहिजे. जेणेकरून देवी प्रसन्न होऊन भक्तांच्या ठिकाणी कायमचे वास्तव्य करू शकेल. - पंडित विनीत शर्मा, ज्योतिषाचार्य
माता वरलक्ष्मीची पूजा कशी करावी? : माता लक्ष्मीला कमळाची फुले आवडतात. कमळाच्या फुलांनी मातेची पूजा करावी. या दिवशी व्रत करण्याचा विशेष नियम आहे. सुक्तम लक्ष्मी चालीसा, लक्ष्मी सहस्त्रनाम, कनकधारा स्रोत पठण करावे. या दिवशी महालक्ष्मीच्या 108 शुभ नामांचा भक्तीभावाने जप केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते. तसेच प्रार्थनास्थळाची स्वच्छता करावी. माता लक्ष्मीची मुर्ति लाल किंवा पिवळ्या कपड्यांमध्ये ठेवावे. मंत्रोच्चाराने वरलक्ष्मीची प्रतिष्ठापना करून गंगाजल, केवड्याचे पाणी आणि तलावांच्या पाण्याने अभिषेक करावा.
अशी करा पूजा
- वरलक्ष्मी व्रताच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून व्रताचा सकल्प घ्यावा.
- पूजेचे ठिकाण गंगाजल शिंपडून शुद्ध आणि स्वच्छ करा
- लाकडी चौकटीवर लाल रंगाचे कापड पसरवा आणि त्यावर लक्ष्मीची मूर्ती किंवा चित्र स्थापित करा.
- मूर्ती किंवा चित्राजवळ तांदूळ ठेवा आणि त्यावर पाण्याने भरलेला कलश ठेवा.
- कलशाभोवती चंदनाची पेस्ट लावा. या दरम्यान लक्ष्मीच्या मंत्रांचा जप करा.
- लक्ष्मीला नारळ, फुले, हळद, कुंकू, हार आणि 16 भूषणे अर्पण करा.
- देवीला मिठाईचा भोग द्या.
- तुपाचा दिवा लावा, धूप जाळा
- वरलक्ष्मी व्रत कथा जरूर वाचा
- आरतीनंतर प्रसाद वाटप करा
- पूजेदरम्यान लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी : देवी लक्ष्मीला कुंकू, चंदन, साखर, मध, कमळाचे फू यांचा अभिषेक करावा. पूजेच्या वेळी 'ओम महालक्ष्मी नमः' या महामंत्राचा जप करावा. श्री सूक्ताचा पहिला मंत्रही जपला पाहिजे. गरजू अधीनस्थ कर्मचाऱ्यांनी गरिबांना मदत करावी. जुने कर्ज जे फेडण्यायोग्य झाले आहे, तेही फेडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे देवी लक्ष्मी भक्तांवर आपला कृपावर्षाव करते, असे मानले जाते.
हेही वाचा :