हैदराबाद : प्रभू श्रीरामाला एकवचनी मनले जात असल्याने हिंदू धर्मात प्रभू श्रीरामाला महत्वाचे स्थान देण्यात आले आहे. त्यांच्या पत्नी माता सीता यांच्या पूजेसाठी सीता नवमी साजरी करण्यात येते. यावर्षी सीता नवमी 28 एप्रिलला येत असून दुसऱ्या दिवशी सीता नवमी समाप्त होणार आहे. त्यामुळे 29 एप्रिललाच सीता नवमी साजरी करण्यात येणार असल्याचे ज्योतिष्यतज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.
का साजरी करण्यात येते सीता नवमी : सीता नवमीला हिंदू धर्मात खूप महत्वाचे मानण्यात येते. सीता नवमीच्या दिवशीच माता सीतेचा जन्म झाला होता. त्यामुळे देशभरात सीता नवमी मोठ्या भक्तीभावाने साजरी करण्यात येते. विशेष म्हणजे या दिवशी खास महत्वाचे योग येत असल्याने यावर्षीची सीता नवमीचे महत्व आणखी वाढले आहे.
कधी आहे सीता नवमीचा योग : सीता नवमीला देशभरात उत्साहाने साजरी करण्यात येते. यावर्षीचा सीता नवमीचा योग 28 एप्रिलच्या सायंकाळी 4 वाजून 01 मिनिटांनी सुरू होत आहे. हा योग दुसऱ्या दिवशी सायंकाळी 6 वाजून 22 मिनिटांनी समाप्त होणार आहे. त्यामुळे सीता नवमी 29 एप्रिलला साजरी करण्यात येणार आहे.
माता लक्ष्मीचे प्रतिक आहे सीता : सीता मातेला माता लक्ष्मीचे प्रतिक असल्याचे मानण्यात येते. त्यामुळे सीता नवमीच्या दिवशी महिला व्रत ठेवतात. माता सीतेची पूजा केल्याने लक्ष्मी प्रसन्न होत असल्याची अख्यायिका हिंदू धर्मग्रंथात कथन केली जाते. त्यामुळे महिला सीता नवमीला माता सीतेची मोठ्या भक्तीभावाने पूजा करतात. त्यासह माता सीतेची पूजा केल्याने वैवाहिक जीवनात सुख, शांती आणि संतान सुख मिळत असल्याचे ज्योतिष्यतज्ज्ञ स्पष्ट करतात. सीता नवमीला विवाहिता आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात.
Disclaimer - या लेखात दिलेली माहिती ज्योतिष्यतज्ज्ञांच्या मतावर आधारित आहे. ईटीव्ही भारत कोणतीही अंधश्रद्धा पसरवत नाही, किंवा अंधश्रद्धेला खतपाणीही घालत नाही.
हेही वाचा - Akshaya Tritiya 2023 : साडेतीन मुहुर्तापैकी अक्षय तृतीया आहे महत्वाचा मुहुर्त, जाणून घ्या अक्षय तृतीयाचा इतिहास