ETV Bharat / sukhibhava

Short Sleep Clogged Leg Arteries : रात्रीच्या कमी झोपेमुळे पायांच्या रक्तवाहिन्या बंद होण्याचा धोका दुपटीने वाढतो, संशोधकांचा दावा - पेरिफेरल आर्टिरियल डिसीज

झोप हा शरीरासाठी सगळ्यात महत्वाचा घटक आहे. मात्र अनेक जण झोपेला दुय्यम स्थान देत असल्याने नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. अपुरी झोप घेतल्याने पेरिफेरल आर्टिरियल डिसीज (पीएडी) होण्याचा धोका असल्याचा दावा युरोपियन संशोधकांनी केला आहे.

Short Sleep Clogged Leg Arteries
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Mar 16, 2023, 7:02 PM IST

Updated : Mar 17, 2023, 6:52 AM IST

वॉशिंग्टन : झोप हा सगळ्यांच्या शरीरासाठी महत्वाचा असलेला घटक आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला दिवसातून ८ तास शांत झोप घेणे आवश्यक आहे. मात्र रात्री पाच तासांपेक्षा कमी झोप घेतल्याने पेरिफेरल आर्टिरियल डिसीज (पीएडी) होण्याचा धोका 74 टक्क्यांनी वाढत असल्याचा दावा युरोपियन हार्ट जर्नल ओपनमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात करण्यात आला आहे. त्यामुळे दररोज आठ तास झोपणे आवश्यक असल्याचा दावा या संशोधनाचे संशोधक डॉ शुआई युआन यांनी केला आहे.

धमन्या बंद होण्याचा धोका : अपुरी झोप घेण्यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. जगातील 200 दशलक्षाहून अधिक लोकांना पेरिफेरल आर्टिरियल डिसीज (पीएडी) या आजाराने ग्रासले आहे. यामुळे नागरिकांच्या पायांमधील धमन्या बंद पडल्या आहेत. हा आजार पायातील धमन्यांमधील रक्त प्रवाह प्रतिबंधित करतात आणि हृदयविकाराचा धोका वाढवतात असा दावाही डॉ. युआन यांनी केला आहे.

झोप की डुलकी संशोधकांनी केले विश्लेषण : रात्रीची अपुरी झोप आणि दिवसा झोप न लागणे यामुळे कोरोनरी धमनी रोगाचा वाढता धोका असल्याचे स्पष्ट होते. हा धोका पेरिफेरल आर्टिरियल डिसीज (पीएडी) रक्तवाहिन्या बंद झाल्यामुळे उद्भवत असल्याचेही डॉ युआन यांनी स्पष्ट केले. याशिवाय झोपेच्या समस्या पेरिफेरल आर्टिरियल डिसीजमध्ये सगळ्यात जास्त असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. या संशोधकांनी ६ लाख ५० हजार नागरिकांवर संशोधन केले. या संशोधनात त्यांनी कमी झोपेचा कालावधी आणि दिवसा डुलकी घेणाऱ्या नागरिकांवर संशोधन केले. त्यासह त्यांनी अनुवांशिक डाटा वापरल्याचेही या संशोधकांनी स्पष्ट केले.

पाच तास झोप घेणे धोकादायक : नागरिकांच्या झोपेच्या सवयी आणि पेरिफेरल आर्टिरियल डिसीज यांच्यातील संबंध आढळून आला. मात्र झोपेच्या सवयीमुळे धमन्यांचा आजार होतो किवा धमन्यांच्या आजारामुळे झोपमोड होते याचा संबंध घालणे निश्चित सांगू शकत नसल्याचेही डॉ युआन यांनी यावेळी स्पष्ट केले. सगळ्यात कमी झोपणाऱ्या नागरिकांना धमन्यांचा आजार होण्याचा दुप्पट धोका असल्याचे ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यासाठी 53 हजार 416 प्रौढ नागरिकांचे निरीक्षणात्मक विश्लेषण करण्यात आले. यात सात ते आठ तासांच्या तुलनेत रात्री पाच तासांपेक्षा कमी झोपणे धमन्यांच्या आजाराच्या जवळजवळ दुप्पट जोखमीशी संबंधित असल्याचेही डॉ युआन यांनी यावेळी स्पष्ट केले.

हेही वाचा - Drinking Coffee May Weight Loss : कॉफी पिल्याने वजन कमी होण्यास होते मदत, मधुमेहाचा धोकाही टाळता येतो

Last Updated : Mar 17, 2023, 6:52 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.