हैदराबाद : पृथ्वीवर पर्यावरण संवर्धन करण्यासाठी अनेक संस्था प्रयत्न करत आहेत. मात्र तरीही मोठ्या प्रमाणात कचरा जमा होत असल्याने पृथ्वीवरील पर्यावरण धोक्यात आले आहे. त्यामुळे संयुक्त राष्ट्राने ३० मार्च हा आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिवस म्हणून घोषित केला आहे. संयुक्त राष्ट्राने याबाबतची घोषणा १४ डिसेंबर २०२२ ला केली आहे. त्यामुळे शून्य कचरा दिवस २०२३ पासून दरवर्षी साजरा करण्यात येणार आहे.
मानव एका वर्षात करतो २.२४ अब्ज टन घनकचरा तयार : संयुक्त राष्ट्राने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शून्य कचरा दिवसाची घोषणा केली आहे. त्यामुळे यावर्षीपासून शून्य कचरा दिवसाची सुरुवात होणार आहे. मानव एका वर्षात अंदाजे २.२४ अब्ज टन घनकचरा तयार करत असल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार स्पष्ट झाले आहे. २०५० पर्यंत ही संख्या प्रतिवर्षी ३.८८ अब्ज टनांपर्यंत वाढू शकते. त्यामुळे शून्य कचरा उपक्रमांचे महत्त्व ओळखून संयुक्त राष्ट्राच्या महासभेने १४ डिसेंबर २०२२ रोजी ३० मार्च हा आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिवस म्हणून घोषित केला आहे.
दरवर्षी ९३१ दशलक्ष टन अन्न जाते वाया : संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण अहवालानुसार दरवर्षी सुमारे ९३१ दशलक्ष टन अन्न वाया जाते. तर २०४० पर्यंत ३७ दशलक्ष टन प्लास्टिक कचरा महासागरात प्रवेश करू शकतो. कचऱ्यामुळे शहरातील वातावरणात वायू उत्सर्जन होऊन जैवविविधतेचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे शून्य कचरा उपक्रम कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यात महत्वाची भूमीका बजावणार आहे. प्रदूषण कमी करण्यात जैवविविधतेचे संरक्षण करण्यास यामुळे मदत होईल. त्यासह अन्न सुरक्षा वाढवून मानवी आरोग्यामध्ये सुधारणा करण्यातही मदत होणार असल्याचे संयुक्त राष्ट्र संघाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
काय आहे इतिहास : संयुक्त राष्ट्र संघाने ३० मार्च हा जागतिक शून्य कचरा दिन म्हणून घोषित केला आहे. संयुक्त राष्ट्र संघाने १४ डिसेंबर २०२२ रोजी पार पडलेल्या आपल्या ७७ व्या अधिवेशनात ३० मार्च हा आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिवस म्हणून घोषित करण्याचा ठराव केला आहे. त्यामुळे प्लास्टिक प्रदूषण समाप्त करण्याचेही आव्हान संयुक्त राष्ट्र संघाने घेतले आहे. याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. याबाबतचा ठरावही २ मार्च २०२२ रोजी युनायटेड नेशन्स एन्व्हायर्नमेंट असेंब्लीमध्ये स्वीकारण्यात आला आहे. त्यामुळे युनायटेड नेशन्स सिस्टमचे सदस्य देशांना जनजागृती करण्यासारख्या उपक्रमांचे आयोजन करण्यासाठी आमंत्रित केले जाते. नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी #BeatWastePollution आणि #ZeroWasteDay सारखे टॅग वापरून सोशल मीडियावर प्रचार करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते.
हेही वाचा - Yoga Rituals For Sound Sleep : निद्रानाश असलेल्या रुग्णांसाठी योग आणि निसर्गोपचार ठरते वरदान