वजन कमी करणे हा सध्या आरोग्याबाबतचा प्रमुख मुद्दा बनला आहे. यासाठी मागील काही वर्षात वेगवेगळ्या प्रकारच्या आहारपद्धती लोकप्रिय झाल्या आहेत. प्रत्येक दुसऱ्या दिवशी वजन कमी करण्याचे आश्वासन देणारी आहारपद्धती तुमच्या कानावर पडते. लो कर्बपासून डिटॉक्सपर्यंत ते मध्यंतरी उपवास करण्यापर्यंत आमच्याकडे अनेक प्रकारची आहारपद्धती आहे. मात्र, या प्रत्येक आहारपद्धतीमध्ये फायदे आणि तोटे दोन्ही आहेत.
ईटीव्ही भारत सुखीभवने डॉ. कृती एस. धीरवानी यांच्याशी संवाद साधला. डॉ. कृती या होमिओपॅथी कन्सल्टंट आहेत. तसेच सनशाईन होमिओपॅथी क्लिनिक मुंबई येथे क्लिनिकल आहारतज्ञ म्हणून कार्यरत आहेत.
काही लोकप्रिय आहारपद्धती तसेच आपण योग्य कसे निवडू शकता याबाबतही माहिती -
अटकिन्स आहारपद्धती (ATKINS DIET) -
हृदयरोगतज्ञ रॉबर्ट अटकिन्स यांनी ही आहारपद्धती 1972मध्ये सुरू केली. तेव्हापासून ही आहापद्धती लोकप्रिय आहे. यात वजन कमी करण्यासाठी लो-कर्ब पद्धतीचा वापर करण्यात येतो. या आहारपद्धतीत असा दावा करण्यात आला आहे की, जर तुम्ही जास्त कार्बोहायड्रेट्स युक्त पदार्थ टाळले तरी प्रोटीन आणि फॅटयुक्त पदार्थ खाऊन तुम्ही वजन कमी करू शकता.
या आहारपद्धतीतील चार टप्पे -
⦁ समावेश (Induction) – 20 ते 25 ग्राम कार्बोहायड्रेट्स प्रत्येक दिवशी
⦁ समतोल (Balancing) – 25 ते 50 ग्राम कार्बोहायड्रेट्स प्रत्येक दिवशी
⦁ छान ट्युनिंग (Fine tuning) – 50 ते 80 ग्राम कार्बोहायड्रेट्स प्रत्येक दिवशी
⦁ देखभाल (Maintenance) – 100 ग्रामपर्यंत कार्बोहायड्रेट्स प्रत्येक दिवशी
जेव्हा तुमचे वजन जास्त असेल, ते तुम्ही कमी करुन तुम्ही तुमचे आरोग्य चांगले ठेवू शकता, आणि आम्हाला माहिती आहे की, अटकिन्स आहारपद्धती मदत करते. मात्र, अटकिन्स आहारपद्धतीमध्ये जास्त प्रमाणातील मांसाहार असलेले पदार्थातील प्रोटीन आणि फॅट आरोग्यावर परिणाम करु शकतो.
जर तुम्हाला मधुमेह, हृदयविकार, किडनीसंबंधी आजार किंवा उच्च कोलेस्टेरॉलसंबंधी काही समस्या असेल तर ही आहारपद्धती सुरू करण्याआधी तुम्ही तुमच्या डॉक्टर्ससोबत संपर्क साधा. जेणेकरून ही कार्बोहायड्रेट्सचा समतोल, फॅट आणि प्रोटीन तुमच्यासाठी योग्य आहे की नाही याबाबत माहिती होण्यास मदत होईल.
किटो डायट (KETO DIET) -
अलिकडच्या वर्षांत केटो आहारपद्धती सर्वात लोकप्रिय आहारांपैकी एक बनली आहे. किटो आहारपद्धतीत उच्च प्रमाणातील फॅट, मध्यम प्रमाणातील प्रोटीन आणि मर्यादित स्वरुपातील कार्बोहायड्रेट्सचा वापर करावा, असे सुचविले आहे. यात सहसा 75 टक्के, 20 टक्के, आणि 5 टक्के नियमित कॅलरिज कमी होतात.
तुम्ही नियमित या आहारपद्धतीचा अवलंब केला तर तुमच्या शरीरत किटोसिस प्रवेश करतात. याचा अर्थ ऊर्जेसाठी कार्बोहायड्रेट्सऐवजी फॅटचा वापर केला जातो.
या आहारपद्धतीचा फायदा हा प्रभावी आहे. मात्र, यासोबतच याचे काही कमतरताही आहेत. सामान्य समस्येमध्ये किडनी स्टोन, विटामिन आणि खनिजाची कमतरता, लैंगिकदृष्ट्या कार्यशील त्रास आणि बद्धकोष्ठता, यांचा समावेश आहे. बालकांमधील समस्येवर उपचार करण्यासाठी 1920 पासून डॉक्टर्स या आहारपद्धतीचा वापर करत आहेत.
मधुमेह, पार्किंसन, अल्झायमर, डिमेंशिया, बायपोलर डिसॉर्डर आणि कर्करोगासारख्या आजारांवरही उपचारासाठी या आहारपद्धतीचा वापर केला जातो.
डॅश आहारपद्धती (DASH-Dietary Approach to Stop Hypertension) -
ही सर्वसमावेशक आरोग्यदायी आहारपद्धती आहे. या आहापद्धतीचे ध्येय वजन कमी करणे नाही तर रक्तदाब कमी करणे आहे. मात्र, याचबरोबरच ज्याला वजन कमी करायचे आहे, मधुमेहावर नियंत्रण आणायचे आहे, त्यासाठीसुद्धा ही आहारपद्धती मदत करते.
महत्त्वपूर्ण बाबींचा यात समावेश -
⦁ आहाराचे प्रमाण
⦁ वेगवेगळ्या आरोग्यदायी पदार्थांचे सेवन
⦁ आहारातील समतोल साधणे
डॅश आहारपद्धतीत धान्य, फळे, भाज्या, कमी फॅट असलेले दुधाचे पदार्थ यासोबतच मासे, चिकन याचा समावेश आहे. ही आहारपद्धती वजन कमी करण्यासाठी नाही. तर आवश्यक तितका वजनाचा समतोल साधण्यासाठी ही आहारपद्धती मदत करते. ही आधारपद्धती कोणती आरोग्यदायी फळे खावीत, यासाठीही मार्गदर्शन करते. तर आतापर्यंत या आहारपद्धतीमध्ये त्रुटी नाहीत.
एकच आहारपद्धती सर्वांसाठी लागू होत नाही. याबाबत कोणताही आहार घेण्यापूर्वी नोंद करावी. वजन कमी करण्यासाठी किंवा आरोग्यदायी आयुष्यासाठी जे तुमच्या जीवनशैलीमध्ये शक्य असे थोडे बदल करणे आवश्यक आहे. आहार नियोजनात तुमचा वैद्यकीय इतिहास, अन्न प्राधान्ये आणि लक्ष्य गृहित धरायला हवा.
वजन कमी करण्याचा आहारपद्धती तुमच्यासाठी योग्य आहे की नाही, हे तपासण्यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे खाली दिलेल्या गोष्टी तुमच्या आहारपद्धतीत आहेत की नाही ते तपासा -
⦁ आरोग्यदायी अन्नाचा समतोल (फळे, भाज्या, कमी फॅट डेअरी आणि आरोग्यदायी फॅट्स)
⦁ नियमित व्यायाम
⦁ नियमित समतोल आहार
⦁ सतत जेवण आणि स्नॅक्स
⦁ तुमचे वेळापत्रक फीट ठेवावे
⦁ पदार्थ जे तुम्ही रेस्टॉरंट्समध्ये शोधू शकता
जर तुमच्या वजन कमी करण्याचा नियोजनात वरील बाबींचा समावेश आहे तर ते तुमच्या फायद्याचे ठरेल.