ETV Bharat / sukhibhava

कोरोनाची लागण झाल्यास असा ठेवा तुमचा आहार, १४ दिवसांनी आहारात करा हे बदल - Diet after healing of covid (14 days)

'कोव्हिड-१९'ची लागण झाल्यानंतर (१४ दिवसांचा काळ) औषधोपचार सुरू असतानाचा रुग्णाचा आहार आणि कोव्हिड बरा झाल्यानंतरचा आहार अत्यंत महत्त्वाचा असतो. या काळात रुग्णाचा आहार पौष्टिक आणि सकस असणे गरजेचे आहे. काही विशिष्ट आहारामुळे रुग्णाला तातडीने आराम मिळतो आणि रुग्णाची तब्येत सुधारण्यास मदत होते. कोव्हिडची लागण झाल्यावर रुग्णाच्या उत्तम पोषणासह हायड्रेशन महत्त्वाचे असते. विशेषतः रुग्णाची रोगप्रतिकारशक्ती वाढणे आवश्यक असते. अशा आहारामुळे रुग्णाला रोगाचा सामना करण्यास मदत होते. या संदर्भात ईटीव्ही भारत सुखीभाव टीमने डॉ. पी. व्ही. रंगानायकुलू डॉ. पी व्ही रंगनायकुलु (पीएचडी हिस्ट्री ऑफ मेडिसीन )यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी रुग्णांना आहाराबाबत काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.

Diet after healing of covid
कोव्हिड (१४ दिवसाचा काळ) बरा झाल्यानंतरचा आहार
author img

By

Published : May 24, 2021, 4:46 PM IST

Updated : Jun 3, 2021, 1:39 PM IST

डॉ. रंगानायकुलू यांच्या मते, नेहमीच्या तापाप्रमाणे कोव्हिडचा संसर्ग झाल्यानंतरही रुग्णाच्या भूकेवर मोठा परिणाम होतो. या काळात तोंडाची चव गेल्यामुळे रुग्णाला काही खावेसे वाटत नाही. परंतु रुग्णाची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी द्रव स्वरूपात जीवनसत्त्वे आणि खनिजपदार्थ दिले जातात. या काळात साधारणपणे व्हिटॅमिन सी, डी आणि इतरही जीवनसत्त्वयुक्त आहार देण्यावर भर दिला जातो. करोना विषाणूशी लढा देण्यासाठी डॉक्टर रुग्णाला पौष्टिक आहार घेण्याचा सल्ला देतात. काही नैसर्गिक घटकांमध्ये सूक्ष्म पोषक घटक असतात त्यातूनही रुग्णाला जीवनसत्व मिळू शकतात. आणि त्याची प्रकृती वेगात सुधारू शकते.

'कोव्हिड-१९' संसर्गानंतर रुग्णाचा आहार

'कोव्हिड -१९' चा संसर्ग झाल्यानंतर संबंधित रुग्णाच्या आहारावर मोठा परिणाम होतो. विशेषतः रुग्णाची भूक कमी होते त्यामुळे त्याच्या द्रव आहारावर भर द्यावा लागतो. याशिवाय रुग्णाला पचायला हलका असा आहार दिला जाणे आवश्यक आहे. खिचडी, चपाती, दुधी भोपळा, दोडक्यासारखी भाजी, तसेच तूर दाळ आणि मूग दाळ (हिरवी) यासारख्या कडधान्याचा रुग्णाच्या आहारात समावेश केला जावा असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला असल्याचेही डॉ. रंगानायकुलू यांनी सांगितले.

रुग्णाच्या तब्येतीनुसार दररोज कोणता आहार घ्यावा यासाठी रुग्णाने आपल्या डॉक्टरांशी अथवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. आणि त्याप्रमाणे आपला दैनंदिन आहाराचा तक्ता तयार करावा. या व्यतिरिक्त, रुग्णाने फक्त ताजे शिजविलेले भोजन घ्यावे. शिळे अन्न काटेकोरपणे टाळले पाहिजे. शिवाय कच्चा भाज्या आणि गोड पदार्थ खाणे टाळावे. अनेक रुग्णांना गोड पदार्थ खाण्याची इच्छा होते, परंतु ते मर्यादित स्वरूपात खाल्ले जावेत, असाही सल्ला तज्ज्ञांनी दिला असल्याचे मत डॉ. रंगानायकुलू यांनी व्यक्त केले.

कोव्हिड (१४ दिवसाचा काळ) बरा झाल्यानंतरचा आहार

कोव्हिड बरा झाल्यानंतरच्या आहाराबाबत बोलताना डॉ. रंगनायकुलू म्हणाले, की रुग्णाचा १४ दिवसांचा विलगीकरणाचा कालावधी संपल्यानंतर, रुग्णाची भूक नेहमीपेक्षा वाढलेली असते. रुग्णाला साधारणपणे आठवडाभर अथवा दहा दिवस खूप भूक लागते. परंतु या काळात रुग्णाने प्रथिनेयुक्त आहारावर भर देणे गरजेचे आहे. कारण हा काळ रुग्णाच्या तब्येतीसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो.

फुफ्फुसा आरोग्यासाठी प्रथिनेयुक्त आहार अत्यंत गरजेचा असतो. त्यासाठी शाकाहारी रुग्ण पनीर, अथवा दुधाचे पदार्थ घेऊ शकतात. तसेच, मशरूम, शेंगदाणे आणि सोयाबिन सारख्या पदार्थांचा समावेश शाकाहारी रुग्णाला आपल्या आहारात करता येतो. तर, मांसाहारात अंडी, मांस, चिकन इत्यादी पदार्थांचा समावेश करता येतो. प्रथिनयुक्त आहार फुप्फुसाच्या आरोग्यावर अधिक उपयुक्त असतात. प्रथिनयुक्त आहार नसेल तर उपचार होणे कठीण होते.

रुग्णांनी आणखी काय लक्षात ठेवावे?

अनेकदा रुग्ण कोव्हिड बरा झाल्यानंतरही अशक्तपणा जाणवत असल्याची तक्रार करतात. अशक्तपणा जाणवू नये यासाठी रुग्णांनी

योग्य आहाराबरोबरच शारीरिक कष्टदेखील घेऊ नयेत असा सल्ला तज्ज्ञांनी दिला असल्याचे डॉ. रंगनायकुलू यांनी दिला आहे.

सुदृढ आरोग्यासाठी व्यायाम करणे गरजेचे आहे, परंतु कोव्हिड -१९ बरा झाल्यानंतर रुग्णांनी हलका व्यायाम अथवा काही श्वासोच्छवासाचे सोपे व्यायाम करावेत. कोव्हिड बरा झाल्यानंतर रुग्णांनी हंगामी फळे आणि भाज्यांचा आहारात भरपूर प्रमाणात समावेश करावा. मात्र, डबाबंद गोठलेले पदार्थ (फ्रोजन फुड) खाणे टाळावे. तसेच, मेदयुक्त अथवा मिठाईसारखे अति गोड पदार्थ खाणे टाळावे. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) केलेल्या शिफारसीनुसार, गोड खावेसे वाटल्यास रुग्णाने ताज्या फळांना नेहमीच प्राधान्य दिले पाहिजे.

प्रथिनेयुक्त आहाराबरोबरच रुग्णांनी फायबरयुक्त आहार घेण्याचा सल्लाही जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएच) दिला आहे. फायबरयुक्त आहारामुळे पचनशक्ती सुधारते आणि पोट भरल्याची भावनाही दीर्घकाळ राहाते, त्यामुळे अगदी सहजच अति खाणे टाळण्यास मदत होते. फायबरयुक्त आहारासाठी भाज्या, फळे, डाळी, सत्त्वयुक्त पदार्थांचा समावेश अन्नात करण्यावर भर द्यावा. व्हाइट पास्ता, भात, मैद्याचा ब्रेड याऐवजी ओट्स, ब्राउन पास्ता आणि ब्राऊन राईस आणि गव्हाचा ब्रेडचा समावेश अन्नात करावा.

घन पदार्थांव्यतिरिक्त रुग्णाने दिवसभर भरपूरप्रमाणात पाणी प्यावे. कोव्हिड झालेलेल्या रुग्णाने अथवा कोव्हिड बरा झालेल्या रुग्णाने पुरेसे पाणी प्यावे. पोषक पदार्थांसाठी गोड पदार्थ अथवा पेये पिणे टाळले पाहिजे. त्याऐवजी रुग्णाने नारळपाणी घेणे गरजेचे आहे. नारळपाणी हे पोषक तत्वे मिळण्याचा एक चांगला स्त्रोत आहे. त्यामुळेच निरोगी आणि संतुलित आहार घेतल्यास कोव्हिडनंतरही रुग्णाची प्रकृती लवकर आणि वेगात सुधारू शकते, असेही डॉ. रंगनायकुलू यांनी सांगितले.

हेही वाचा - चक्रीवादळ: मालमत्तेचे नुकसान कमी करण्यावर लक्ष केंद्रित करायला हवे

Last Updated : Jun 3, 2021, 1:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.