ETV Bharat / sukhibhava

Almond Milk Consumption : बदाम दुधाच्या सेवनाने शरीराला होतात 'हे' फायदे

author img

By

Published : Feb 26, 2022, 4:04 PM IST

बदाम आणि दुधाच्या सेवनाने ( Almond Milk Consumption ) आरोग्यासाठी खूप फायदे होतात. त्याच्या सेवनाने शरीराला नैसर्गिकरीत्या शक्ती, उर्जा ( Almonds And Milk Benefits To Body ) मिळते.

Almond Milk Consumption
Almond Milk Consumption

हैदराबाद - बदाम बारीक करुन बनवलेले दूध असो अथवा दुधात भिजवलेले बदामांचे सेवन असो, त्याचे आरोग्यासाठी खूप फायदे ( Almonds And Milk Benefits To Body ) होतात. घरातील वडीलधारी किंवा डॉक्टर सगळेच सांगतात की, दूध आणि बदामाचे योग्य प्रमाणात सेवन ( Almond Milk Consumption ) केल्याने शरीरात नैसर्गिकरीत्या शक्ती, उर्जा मिळते. तसेच, रोगांना दूर ठेवण्यास मदत होते. बदाम आणि दुधात भरपूर पौष्टिक घटक असतात. त्याबाबत आपण जाणून घेणार आहोत.

बदाम : बदामात फॅटी अ‍ॅसिड, लिपिड, अमिनो अ‍ॅसिड, प्रथिने आणि कार्बोहायड्रेट योग्य प्रमाणात आढळून येतात. हे व्हिटॅमिन ई, झिंक, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिडच्या मुख्य प्रकारांपैकी एक मानले जाते. त्याशिवाय त्यात फायबर, आयर्न सारखे पोषक घटकही मुबलक प्रमाणात आढळते.

दूध : दुध हे संपूर्ण आहाराच्या श्रेणीत आहे. त्यामध्ये पाणी, प्रथिने, कार्बोहायड्रेट, लिपिड फॅट, साखर, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम, जस्त, तांबे, सेलेनियम, रिबोफ्लेविन, नियासिन, पॅन्टोथेनिक अ‍ॅसिड, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी-6, बी-12, व्हिटॅमिनमध्ये ई, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन के, बीटा केराटिन, आयोडीन, रेटिनॉल आणि कोलीन आणि फॅट इत्यादींसह अनेक खनिज आढळून येतात.

याबाबत डॉक्टर दिव्या सांगतात की, बदाम आणि दूधाचे मिश्रण हे शरीरात टॉनिक म्हणून काम करते. या दोघांचे एकत्र सेवन केल्याने शरीराला रोगांपासून वाचवण्यासाठी मदत होते. त्याच्यामुळे शरीराच्या पौष्टिक गरजा देखील पूर्ण होत असून, त्याने मानसिक आरोग्याला खूप फायदा होतो.

बदाम आणि दुधाचे फायदे

  • बदाम आणि दुधात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी मुबलक प्रमाणात आढळते. त्याचे सेवन सर्व वयोगटातील स्त्री आणि पुरुष दोघांच्याही आरोग्यासाठी फायदेशीर आहे. याच्या सेवनाने लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांची हाडे मजबूत होतात. तसेच, संधिवात आणि हाडांच्या सर्व आजांरापासून संरक्षण होण्यास मदत मिळते.
  • दूध आणि बदाम एकत्र खाल्ल्याने दोन्हीतील पोषक घटक आरोग्य चांगले राखण्यासाठी मदते करते. त्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते.
  • बदामामधील असणाऱ्या प्रोटीनमुळे आपल्या मेंदुचे कार्य सुधारते. बदाम दुधाच्या फायद्यांबाबत केलेल्या संशोधनात हे समोर आले की याच्या सेवनाने स्मरणशक्ती सुधारण्यास मदत होते.
  • बदाम आणि दूधाचे एकत्र सेवन केल्याने शरीराला आवश्यक उर्जा प्राप्त होते. त्यामुळे थकवा आणि अशक्तपणा कमी होण्यास मदत होते. शरीरात पुरेशा प्रमाणात असलेल्या उर्जेमुळे, व्यक्ती दिवसभर उत्साही राहते.
  • कमी वजन असणाऱ्या लोकांनी दूध आणि बदाम एकत्र सेवन केल्याने खूप फायदे होतात.
  • बदामाच्या दुधात असलेल्या व्हिटॅमिन ए मुलबक प्रमाणात आढळत असल्याने ते डोळ्यांसाठी फायदेशीर ठरते. विशेषत: मुलांना नियमितपणे बदामाचे दूध सेवन करण्यास दिल्याने दृष्टीदोष सारख्या समस्या कमी होतात.
  • बदाम आणि दूधाचे एकत्र सेवन करणे अंतर्गत आरोग्यासोबत, त्वचा आणि केसांसाठी देखील फायदेशीर ठरते. त्यात असणाऱ्या व्हिटॅमिन ई, कॅल्शिअम आणि अन्य पोषण घटकांमुळे त्वचा आणि केस नैसर्गिकरित्या निरोगी आणि चमकदार बनतात.

बदाम दूधाचे सेवन 'या' लोकांसाठी नुकसानदायक

डॉ. दिव्या यांनी म्हटल्यानुसार, बदामाच्या दुधाचा आरोग्याला सर्व प्रकारे फायदा होत असला, तरी त्याचे सेवन कमी प्रमाणात करणे आवश्यक आहे. ज्यांना किडनी आणि यकृताचा त्रास आहे, अशा लोकांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बदाम आणि दुधाचे सेवन करावे. कारण त्यात असणाऱ्या पोटॅशियममुळे किडीनीचा त्रास होऊ शकतो. तर, यकृताच्या समस्या वाढू शकतात. तसेच, ज्या लोकांना थायरॉईड आणि मधुमेहाची समस्या आहे. ज्यांची पचनसंस्था कमकुवत आहे अथवा ज्यांना श्वसनाचे विकार आहे, त्यांनी सुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बदाम दुधाचे सेवन करावे.

हेही वाचा - High Fiber Diet : हाय फायबरयुक्त अन्नाचे सेवन केल्यास स्मृतीभ्रंश होण्याचा धोका कमी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.