ETV Bharat / sukhibhava

Benefits of steam : वाफ घेतल्यानं मिळते चेहऱ्याच्या अनेक समस्यांपासून सुटका; जाणून घ्या फायदे

Benefits of steam : चेहऱ्याच्या समस्या दूर करण्यासाठी तुम्ही स्टीम घेऊ शकता. याच्या मदतीनं तुम्ही तुमची त्वचा डागरहित आणि सुंदर बनवू शकता.

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 3, 2023, 1:53 PM IST

Benefits of steam
वाफ घेतल्यानं मिळते चेहऱ्याच्या अनेक समस्यांपासून सुटका

हैदराबाद Benefits of steam : स्त्री असो वा पुरुष प्रत्येकाला स्किन टॅनिंग आणि अतिरिक्त तेलकट चेहरा या समस्येला सामोरं जावं लागतं. तसंच जेव्हा घाम जास्त वेळ चेहऱ्यावर राहतो तेव्हा त्यामुळं त्वचेचे आजार आणि मुरुमं होण्याची शक्यता वाढते. अशा परिस्थितीत तुम्ही घरगुती उपायांच्या मदतीनं चेहऱ्याच्या समस्या कमी करू शकता. जर तुम्हाला चेहऱ्याच्या समस्या लवकर दूर करायच्या असतील तर तुम्ही स्टीम घेऊ शकता. नियमितपणे वाफ घेतल्यानं तुमच्या चेहऱ्यावरची छिद्रं उघडतात आणि चेहऱ्याच्या आत खोलवर साचलेली घाण निघून जाते. तसंच चेहरा चमकू लागतो. तुम्हालाही तुमचा चेहरा स्वच्छ आणि डागरहित बनवायचा असेल तर तुम्ही वाफ घेऊ शकता. वाफ घेण्याचे काही फायदे पुढीलप्रमाणे :

चेहऱ्यावरील छिद्रं मोकळी होतात : वाफ घेतल्यानं चेहऱ्यावरील छिद्रं उघडतात आणि चेहऱ्यावर जमा झालेली अतिरिक्त घाण साफ होते. सेबम सेबेशियस ग्रंथीद्वारे स्राव होतो. सेबम चेहऱ्याचं तेल आहे आणि जास्त सेबममुळं चेहऱ्यावर मुरुमांची समस्या उद्भवते.

हायड्रेट त्वचा : त्वचेच्या हायड्रेशनसाठी तुम्ही चेहऱ्यावर स्टीम घेऊ शकता. हायड्रेटेड राहिल्यानं त्वचेची लवचिकता टिकून राहते. चेहऱ्याला मॉइश्चरायझ करण्यासाठी तुम्ही मॉइश्चरायझिंग क्रीम वापरू शकता, पण त्वचा हायड्रेट करण्यासाठी तुम्हाला पुरेसं पाणी प्यावं लागेल किंवा चेहऱ्यावर स्टीम घ्यावी लागेल.

मुरुमं कमी करण्यासाठी उपयुक्त : जेव्हा चेहऱ्यावरील छिद्रात जास्त सेबम आणि घाण जमा होऊ लागतो तेव्हा चेहऱ्यावर मुरुमं होतात. पण जेव्हा तुम्ही वाफ घेता तेव्हा चेहऱ्यावरची छिद्रं उघडतात आणि अतिरिक्त सीबम आणि घाण निघून जाते. अशाप्रकारे तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्स हळूहळू बरे होऊ लागतात.

चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करा : वाफ इनहेल केल्यानं तुमच्या चेहऱ्यावरील उबदारपणामुळं रक्ताभिसरण सुधारतं. यामुळं तुमच्या त्वचेपर्यंत ऑक्सिजन पोहोचू लागतो आणि त्वचा पूर्वीपेक्षा उजळ होते. रक्ताभिसरण चांगलं झाल्यामुळं चेहऱ्याचं कोलेजनही सुधारतं. वाफ घेतल्यानं चेहऱ्यावरील सुरकुत्याही लवकर बऱ्या होऊ लागतात.

ब्लॅकहेड्स काढून टाका : वाफ घेतल्यानं छिद्रं उघडतात तेव्हा ब्लॅकहेड्स साफ करणं सोपं होतं. ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी, सुमारे दहा मिनिटं आपल्या चेहऱ्याला वाफ द्या आणि नंतर आपला चेहरा स्क्रब करा. यामुळं ब्लॅकहेड्स सहज दूर होतात.

वाफ घेण्याची योग्य पद्धत :

  • तुमचा चेहरा वाफ काढण्यासाठी तुम्ही स्टीमर वापरू शकता. पण तुमच्या घरात स्टीमर नसेल, तरीही तुम्ही वाफे घेऊ शकता.
  • यासाठी तुम्ही सुमारे चार कप पाणी उकळा.
  • पाण्याला उकळी आली की गॅस बंद करा.
  • हे पाणी एका मोठ्या भांड्यात काढा.
  • यानंतर टॉवेल घेऊन चेहरा झाकून वाफ घ्या.
  • एकाच वेळी जास्त वेळ वाफ घेवू नये हे लक्षात ठेवा.
  • श्वास घेण्यास त्रास होत असल्यास टॉवेल काढा.
  • आठवड्यातून जास्तीत जास्त दोनदाच वाफ घ्या.
  • एकावेळी 15 ते 20 मिनिटंच वाफ घ्यावी. जास्त वेळ स्टीम इनहेल केल्यानं त्वचा जळू शकते.
  • वाफ घेतल्यावर लगेच चेहऱ्यावर मॉइश्चरायझर वापरा.

हेही वाचा :

  1. Hand Pain Relief Tips : टायपिंग करताना दुखतो का हात ? फॉलो करा या टिप्स...
  2. Breast Cancer Awareness Month 2023 : 'ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस मंथ' 2023; स्तनामध्ये 'ही' लक्षणं दिसल्यास डॉक्टरांशी साधा संपर्क...
  3. World Vegetarian Day 2023 : जागतिक शाकाहारी दिवस 2023; 'हे' शाहकारी पदार्थ आहेत प्रथिनांचं भांडार...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.