नवी दिल्ली : आपण जे अन्न खातो, त्यावरुन आपले शरीर आपल्याला प्रतिसाद देत असते. आहारावरुनच आपल्या शारीरिक आणि भावनिक आरोग्यावर चांगलाच परिणाम होतो. त्यामुळे पौष्टिक आणि संतुलित आहारामुळे आपल्याला निरोगी शरीर, मधुमेह, कर्करोग, जळजळ आणि हृदयविकारासारख्या आजारांचा धोका कमी करण्यास मदत करते. त्यासह आपले वजन नियंत्रित करण्यासही त्याचा उपयोग होत असल्याचा दावा संशोधक अजहर अली सईद यांनी केला आहे.
इंद्रधनुष्य आहाराची संकल्पना : आपण घेत असलेल्या आहारात विविध वैशिष्टपूर्ण आहाराचा समावेश असायला हवा, असे संशोधक अजहर अली सईद यांनी स्पष्ट केले आहे. यासाठी त्यांनी इंद्रधनुष्य आहाराची संकल्पना मांडली आहे. आहार घेताना तुम्ही मनोरंजक आणि आरोग्यदायी संकल्पनांचा वापर करून तुमचे अन्न चवदार आणि पौष्टिक दोन्ही बनवू शकता असे अजहर अली सईद यांनी या संकल्पनेतून स्पष्ट केले आहे. इंद्रधनुष्य आहार घेणे हा चांगले खाण्याचा एक नवीन मार्ग असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. फळे आणि भाज्या हे निरोगी आहाराचा एक भाग आहे. त्यात फायबर, व्हिटॅमिन ए (बीटा कॅरोटीन), व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, जस्त, फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि इतर अनेक फायदेशीर पोषक तत्वांचा उत्तम स्रोत असतो, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. उच्च पाण्याचे प्रमाण असलेली फळे आणि भाज्या देखील हायड्रेशनचा उत्तम स्रोत असू शकतात असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
आहारात करा फळांचा उपयोग : निरोगी राहण्यासाठी इंद्रधनुषी आहाराचे सेवन केले पाहिजे. प्रत्येक रंग विशिष्ट रासायनिक संयुग दर्शवतो, तो वनस्पतींमध्ये नैसर्गिकरित्या असतो. त्यामुळे शरीराचे पोषण आणि संरक्षण करण्यास मदत होते. उदाहरणार्थ, पिवळ्या आणि केशरी पदार्थात कॅरोटीन असते, तर हिरव्या खाद्यपदार्थात क्लोरोफिल असल्याचे दिसून येते. लाल आणि जांभळ्या पदार्था अँथोसायनिन्स हा घटक असतो. त्यामुळे प्रत्येक रंग शरीरात विशिष्ट भूमिका बजावत असल्याने त्या सर्वांचा आपल्या आहारात समावेश करणे आवश्यक असल्याचे मतही अजहर अली सय्यद यांनी व्यक्त केले आहे. तुमच्या आहारात दररोज किमान तीन ते चार फळे आणि भाज्या खाण्याचा सल्ला आहार तज्ज्ञ देतात. या फळात कॅलरी, चरबी आणि साखरेचे प्रमाण कमी असते तर फायबरचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे आरोग्याला चालना देणाऱ्या पॉलीफेनॉलमुळे तुम्ही वजन कमी करू शकता, असेही आहारतज्ज्ञ अझहर अली सय्यद यांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा - World Oral Health Day 2023 : तोंडाचे आरोग्य उत्तम राखणे आहे महत्वाचे, जाणून घ्या कशी घ्यावी काळजी