यवतमाळ - हैदराबाद - नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील वडकी या गावाजवळ कारची आणि ऑटोची धडक झाली असून या अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू झाला असून १५ जण गंभीर जखमी झाले आहेत.
रिधोरा येथील ग्रामस्त परिसरातील प्रसिद्ध असलेल्या आजनसरा येथे एका कार्यक्रमाला जाताना वडकी गावाजवळ कारची (एमएच ३१ डीव्ही १०८७) आणि ऑटोची (एमएच २९ व्ही ९४९६) समोरासमोर धडक झाली. या अपघातामध्ये ऑटोचे २ तुकडे झाले असून रिधोरा गावामध्ये या अपघातामुळे शोककळा पसरली आहे. अरविंद तात्या बोरूले (वय ३५), उमाबाई गुलाबराव शेंडे (५५), येनुबाई शेषराव जुमनाके वय (६०) असे या मृतकांचे नावे असून ते रिधोरा येथील रहिवासी आहेत. जखमींवर राळेगाव वडणेर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे.
जखमींची नावे - लक्ष्मी विजय गुरुनूले (२९) संगीता अरविंद बोरूले (३५), विद्याबाई प्रकाश वडतकर (४०), सरला कांशीराम तोडासे (४०), जया लोनबले (३०) वेदिका बोरूले (१८), समीर उईके (१५), नंदा शेंडे(४०), धनश्री तोडासे (१०), कांताबाई बोरूले (४०), साधना शेंडे (२३), मयंक शेंडे (८), नंदनि सोनवणे (१०), भाग्यश्री शेंडे (२३) वर्ष असून हे सर्व जण रिधोरा या गावातील आहे. ते आजनसरा येथे वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी आणि देवदर्शनासाठी जात होते.