यवतमाळ - शहरातील दत्त चौकात असलेल्या व्यापारी संकुलात चोरट्यांनी एकाच रात्री तीन दुकाने फोडली. तर चार ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला. सोमवारी सकाळी साडेआठ वाजता ही घटना उघडकीस आली.
मोहम्मद शारीक अब्दुल गफ्फार (वय 44 वर्षे, रा. कोहिनूर सोसायटी, यवतमाळ) यांचे बुक स्टॉलचे दुकान आहे. सकाळी नऊ वाजता उघडून रात्री नऊ वाजताच्या दरम्यान बंद केले जाते. रात्री दुकान बंद करून गेल्यानंतर आज सकाळी व्यावसायिक किशोर ढाले यांनी दुकानात चोरी झाल्याची माहिती दिली. त्यांनी लगेच जाऊन दुकानात पाहणी केली. यावेळी शटर उघडून चोरट्यांनी आत प्रवेश केल्याचे दिसले. काऊंटरमधील रोख 17 हजार रुपये, तसेच राहुल लोळगे यांच्या दुकानातून 20 हजार रुपये किमतीचा लॅपटॉप व सुमंत शेटे (वय 30 वर्षे, रा. उन्नती पार्क) यांच्या दुकानातून 18 हजार रुपयांचा लॅपटॉप लंपास केला.
हेही वाचा - विधान परिषद पोटनिवडणूक; महाविकास आघाडी म्हणते आम्ही 350 पार...
व्यापारी संकुलातील गाळे क्रमांक 36, 31, 24, 41 या दुकानांचे शटर उचकडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, चोरट्यांना त्यात यश आले नाही. 55 हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मोहम्मद शारीक यांनी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून अनोळखी चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
हेही वाचा - निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडीमध्ये मान-अपमान नाट्य, महिला पदाधिकारी नाराज