यवतमाळ - जिल्ह्यातील विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या उमरखेड तालुक्यातील पैनगंगा अभयारण्यात मागील दीड वर्षांपासून एकांतात राहणाऱ्या पट्टेदार वाघाला जोडीदारीण मिळाली आहे. नर आणि मादी सोबत असतानाचे काही क्षण वन्यजीव अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या कॅमेरात कैद केले आहेत. पैनगंगा अभयारण्यात वाघाचे देखणे जोडपे आढळल्याने निसर्गप्रेमी व वन्यजीवप्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे. हे दोन्ही वाघ पाच ते सहा वर्षाचे असल्याचे सांगितले जात आहे.
हेही वाचा - व्हॉट्सअपला धक्का! गोपनीयतेच्या धोरणाचा सीसीआय करणार सखोल तपास