यवतमाळ - पांढरकवडा शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर केळापूर येथे जगदंबा मंदिरात नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. या मंदिरात विदर्भ, मराठवाडा, तेलांगाणा, आंध्रप्रदेश अशा दूरवरून भाविक दर्शनासाठी येत असतात. भाविकांना कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून मंदिरात दर्शनाची योग्य ती व्यवस्था करण्यात आली आहे.
हे ही वाचा - कोल्हापुरात आजपासून शारदीय नवरात्रौत्सवाला प्रारंभ
या मंदिराची पार्श्वभूमी ऐतिहासिक असून मंदिराची बांधणी हेमाडपंथी आहेत. वऱ्हाडचा इतिहास या पुस्तकांमध्ये डॉ. या. मा. काळे यांनी चंद्रहास राजांवर जगदंबा प्रसन्न होऊन कुंतलापूर गावात आपला निवास ठेवला. कुंतलापूर म्हणजेच आजचे केळापूर अशी या पुस्तकात उल्लेख आहेत. त्याचप्रमाणे पांडवांनी बारा वर्षाचा वनवास भोगल्यानंतर एक वर्ष अज्ञातवासात असताना या मंदिरात आल्याचेही जाणकार सांगतात.
हे ही वाचा - मुंबईत नवरात्रोत्सवाला सुरूवात, देवी मातेचे उत्साहात आगमन
दुसऱ्या बाजीरावांचे ब्रिटिश सरदार अॅडम्स यांच्या सोबत युद्ध झाले होते. त्यामध्ये बाजीरावाचा पराभव झाल्याने ते या ठिकाणी येऊन काही काळ मुक्काम केल्याचेही पुस्तकात उल्लेख आहेत. या मंदिराच्या गाभाऱ्यात एक भुयार असून ते शहराबाहेर निघत असल्याचे पुजारी यांनी सांगितले. या मंदिराचा काही वर्षांपूर्वी जीर्णोद्धार करण्यात आला आहे. या मंदिराला ऐहासिक व पौराणिक महत्व महत्त्व असल्याने तसेच ही देवी नवसाला पावणारी आहे. सर्वांची मनोकामना पूर्ण करते. त्यामुळे भाविक या नवरात्र उत्सवात दर्शन घेण्यासाठी याठिकाणी येतात. नवरात्र उत्सवात दररोज किमान साठ हजार भाविक देवीचे दर्शन घेतात.
हे ही वाचा - नाशकात नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात