ETV Bharat / state

दारुबंदीच्या नावावर स्वामिनीने विकले महिलांचे कुंकू - संगीता पवार

चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी ही नावालाच झाली आहे. किराणा दुकान, दुधाचे टँकर, एसटी बस, भाजीपाला विकणारे इतकेच नव्हे तर पोलिसांच्या व्हॅनमधून सुद्धा दारूची तस्करी करण्यात येते. अशी दारुबंदी कुठल्या कामाची आहे.

author img

By

Published : Apr 17, 2019, 9:55 AM IST

यवतमाळात महिलांचा विराट मोर्चा

यवतमाळ - जिल्ह्यात दारुबंदीच्या नावावरती महिलांना गोळा करायचे आणि निवडणुकीच्या काळात एखाद्या पक्षाला पाठिंबा द्यायचा, असा नवा उद्योग सुरू झाला आहे. जिल्ह्यातील स्वामिनी दारूबंदी अभियानाचे महेश पवार आणि चंद्रपूर येथील दारुबंदीच्या प्रनेत्या पारोमिता गोसावी यांनी चंद्रपूर-आर्णी लोकसभेच्या निवडणुकीत हेच केले. दारुबंदी आंदोलनातील महिलांचेच कुंकू विकल्याचा आरोप संगीत पवार यांनी दारुबंदी व्यसनमुक्ती आंदोलनाच्या जाहीर सभेत केला.

यवतमाळात महिलांचा विराट मोर्चा

चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी ही नावालाच झाली आहे. किराणा दुकान, दुधाचे टँकर, एसटी बस, भाजीपाला विकणारे इतकेच नव्हे तर पोलिसांच्या व्हॅनमधून सुद्धा दारूची तस्करी करण्यात येते. अशी दारुबंदी कुठल्या कामाची आहे. असे म्हणून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात दारुबंदी करण्याची मागणी केली. गुजरातमध्ये ज्याप्रमाणे संपूर्ण दारुबंदी आहे. तशीच दारूबंदी महाराष्ट्रात करण्यासाठी यवतमाळ येथे दारुबंदी व्यसनमुक्ती आंदोलन समितीच्या वतीने महिलांचा विराट मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला.

अशा प्रकारचे मोर्चे राज्यातील सर्व जिल्ह्यात काढण्यात येणार असल्याचे जाहीर सभेत त्यांनी सांगितले. या दारुबंदी मोर्चामध्ये जिल्ह्यातील ५ हजारावर महिला सहभागी झाल्या होत्या. मोर्चाच्या सुरुवातीला प्रत्येक महिलांनी आपल्या गावात दारुबंदी करण्यासाठी काय केले. तसेच दारुमुळे संसार कसा उघड्यावर पडला हे सांगण्यात आले. दारुबंदीसाठी आझाद मैदान येथून निघालेला मोर्चा शहरातील विविध भागांमधून काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

Intro:दारूबंदीच्या नावावर स्वामिनीने महीलांचे कुंकू विकले-संगीता पवार
दारूबंदीसाठी यवतमाळात महिलांचा विराट मोर्चाBody:यवतमाळ: जिल्ह्यात दारूबंदीच्या नावावरती महिलांना गोळा करायचे आणि निवडणुकीच्या काळात एखाद्या पक्षाला पाठिंबा द्यायचा. असा नवा उधोग सुरू झाला आहे. जिल्ह्यातील स्वामिनी दारूबंदी अभियानाचे महेश पवार आणि चंद्रपूर येथील दारूबंदीच्या प्रनेत्या पारोमिता गोसावी यांनी चंद्रपूर-आर्णी लोकसभेच्या निवडणुकीत हेच केले. दारुबंदी आंदोलनातील महिलांचेच कुंकू विकल्याचे जाहीर सभेत दारूबंदी व्यसनमुक्ती आंदोलनाच्या संगीत पवार यांनी आरोप केला. चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाली. मात्र, ती नावालाच असून किराणा दुकान, दुधाचे टँकर, एसटी बस, भाजीपाला विकणारे इतकेच नव्हे तर पोलिसांच्या व्हॅनमधून सुद्धा दारूची तस्करी करण्यात येते. अशी दारूबंदी कुठल्या कामाची आहे. असे म्हणून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात दारूबंदी करण्याची मागणी केली. गुजरात राज्यामध्ये ज्याप्रमाणे संपूर्ण दारूबंदी आहे. तशीच दारूबंदी महाराष्ट्रात करण्यासाठी यवतमाळ येथे आज दारूबंदी व्यसनमुक्ती आंदोलन समितीच्या वतीने महिलांचा विराट मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला. अशाच प्रकारचे मोर्चे राज्यातील सर्व जिल्ह्यात काढण्यात येणार असल्याचे जाहीर सभेत त्यांनी सांगितले. या दारूबंदी मोर्चामध्ये जिल्ह्यातील ५ हजारावर महिला सहभागी झाल्या होत्या. मोर्चाच्या सुरुवातीला प्रत्येक महिलांनी आपल्या गावात दारूबंदी करण्यासाठी काय केले. तसेच दारुमुळे संसार कसा उघड्यावर पडला हे सांगण्यात आले. दारूबंदीसाठी आझाद मैदान येथून निघालेला मोर्चा शहरातील विविध भागांमधून काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.