यवतमाळ - दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पाठीमागे पाकिस्तान आणि चीन यांचा हात असल्याचे वादग्रस्त विधान केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले होते. या विधानाविरोधात आज दत्त चौकात शिवसेनेच्यावतीने रावसाहेब दानवे यांचा पुतळा जाळून निषेध करण्यात आला. तसेच शिवसेनेकडून रावसाहेब दानवे यांची जीभ कापून आणाऱयाला चारचाकी वाहन आणि दहा लाख रुपयांचे बक्षीससुद्धा जाहीर करण्यात आले आहे.
हेही वाचा - दिल्लीतील शेतकरी आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात; रावसाहेब दानवेंचा दावा
दिल्लीतील शेतकरी आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात - रावसाहेब दानवे
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतकऱ्यांचे पंतप्रधान आहेत. केंद्र सरकार स्वतःच्या तिजोरीतून शेतकऱ्यांच्या हितासाठी पैसे खर्च करायला तयार आहे. पण बाकीच्या लोकांना हे मान्य नसून सध्या शेतकऱ्यांच्या सुरु असलेल्या आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा खळबळजनक दावा केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील टाकळी कोलते गावात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्रमात त्यांनी हा आरोप केला.
सेना कार्यकर्ते आणि पोलिसात झटापट
भाजपचे सरकार कुठलाही गंभीर विषय समोर आला की बुद्धीभेद करताना दिसून येते. वेगवेगळ्या विषयांत गुंतवूण नागरिकांची दिशाभूल करण्याचे कार्य भाजपचे सरकार करत आहे. आता तर काळ्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी आंदोलन करत असताना त्यांच्या आंदोलनामागे पाकिस्तान तसेच चीनचे षडयंत्र असल्याचे वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केले असून, हे सर्व लज्जास्पद असल्याची टीका यावेळी सेनेकडून करण्यात आली. यावेळी रावसाहेब दानवे यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून करण्यात आला. त्यावेळी पोलीस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली.
पेट्रोल दरवाढीचा निषेध
दर दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत चालले आहेत. सामान्य नागरिकांच्या खिशाला आर्थिक झळ बसत आहे. त्यामुळे देशभरात वाढत असलेल्या पेट्रोल तसेच डिझेल दरवाढीविरोधात संताप व्यक्त करण्यात आला.