यवतमाळ - मारेगाव तालुक्यात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. ही मुलगी घरात एकटी असल्याचा फायदा घेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला. आरोपी दिपक सुर्यभान आत्राम (वय 35,रा. हिवरी) याला मारेगाव पोलिसांनी तत्काळ अटक केली आहे.
आई वडील शेतमजुरीसाठी बाहेर गेले असता पीडित मुलगी घरी एकटीच होती. त्यावेळी घरात प्रवेश करून आत्रामने तिचा विनयभंग केला. दरम्यान, पीडितेने आरडाओरडा केला असता आरोपीने तेथून पळ काढला.
दरम्यान, आपल्यासोबत घडलेला प्रकार पीडितेने घरातल्या व्यक्तींना सांगितला. त्यानंतर कुटुंबीयांनी मारेगाव पोलीस ठाणे गाठून आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून आरोपी दिपक आत्राम याच्यावर पोक्सा अंतर्गत गुन्हा दाखल करुन त्याला मारेगाव पोलिसांनी अटक केली.