यवतमाळ - आकर्षक फुलं, फळांच्या झाडांमुळे घराला सौंदर्य येते. फुल झाडांची जोपासना करण्याची आवड वाढत चालली आहे. नर्सरीमधून नागरिकांना हवे ते झाड उपलब्ध होते. मात्र, सध्या ग्राहक नसल्याने नर्सरी चालकांची आर्थिक परिस्थिती संकटात सापडली आहे. मजुरांचा खर्चही निघत नाही.
हेही वाचा - पोलीस मुख्यालयाच्या आवारातच महिला पोलीस कर्मचाऱ्यांची हाणामारी
यवतमाळ शहरात पूर्वीप्रमाणे मोकळी जागा उपलब्ध नाही. तरीदेखील नागरिक पोर्च, गेट, स्लॅपवर फुलझाडांची लागवड करतात. विविध रंग, रूप, आकाराच्या झाडांमुळे घराचे सोंदर्य अधिकच खुलून जाते. इनडोअर, आऊट डोअर, लॉनमध्ये लावण्यासाठी जवळपास दीड हजार प्रकारचे फळं, फुलं, शोभेची झाडे आहेत. लॉकडाऊन काळात नर्सरीत शेख यांनी रोपांची निर्मिती केली. ती रोपे आता विक्रीयोग्य झाली आहेत. परंतु, ग्राहक नसल्याने मजुरांचा खर्चही निघत नाही. रोप आणि कुंडी विक्रीचे दुकानही आहे. फळं, फुलांची झाडे उपलब्ध असली तरी ग्राहक खरेदीसाठी येत नाही. मजूर आणि इतर कोणत्याही प्रकारचा खर्च निघत नाही. नर्सरीचा भार उचलणे आता कठीण झाले असल्याचे नर्सरी चालक सांगतात.