ETV Bharat / state

Kalavati Bandurkar : अमित शाह खोटारडे, मला मदत राहुल गांधींमुळेच मिळाली; जाणून घ्या कोण आहेत कलावती बांदूरकर? - rahul gandhi on Kalavati Bandurkar

यवतमाळ येथे आल्यानंतर राहुल गांधींनी जवळका येथील कलावती बांदूरकर (Kalavati Bandurkar) यांच्या घरी भेट दिली होती. या भेटीवरुन आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राहुल गांधी यांच्यात चांगलाच (Amit Shah on Kalavati Bandurkar) वाद रंगला. त्यांच्या वादात कलावती बांदूरकर यांनी उडी घेत त्यांना काँग्रेसनेच मदत केल्याची माहिती दिली. त्यामुळे कलावती बांदूरकर आता पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.

Parliament Monsoon Session 2023
कलावती बांदूरकर
author img

By

Published : Aug 10, 2023, 2:36 PM IST

Updated : Aug 10, 2023, 3:51 PM IST

माहिती देताना कलावती बांदूरकर

यवतमाळ : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यवतमाळ जिल्ह्यातील कलावती बांदूरकर (Kalavati Bandurkar) यांच्या घरी जाऊन त्यांची कहाणी संसदेत सांगितली. मात्र त्या कलावती बाईंना मोदी सरकारने वीज, घर, शौचालय, धान्य आदींसह सर्व सोयी सुविधा दिल्याचा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत केला. मात्र अमित शाह यांना यवतमाळ जिल्ह्यातील जवळका येथील कलावती बांदूरकर यांनी खोटे पाडले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah on Kalavati Bandurkar) यांना प्रत्युत्तर देताना कलावती बांदूरकर यांनी ते खोट बोलल्याचे म्हणाल्या आहेत. त्या म्हणाल्या की, मला मोदी सरकारने नाही, तर राहुल गांधींनी मदत केली आहे. अमित शाह हे खोटे बोलत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितल्याने अमित शाह यांचे पितळ उघडे पडले आहे.

मला राहुल गांधी यांनीच मदत केली आहे. घर, वीज हेसुद्धा मला राहुल गांधी आल्यानंतरच मिळाले आहे. त्यामुळे राहुल गांधी हे आल्यानंतरच मला सर्व मदत मिळाली. मोदी निवडूण आल्यापासून आतापर्यंत मला आर्थिक काहीच मदत मिळाली नाही. मला सर्व राहुल गांधी यांनीच दिले आहे. त्यामुळे अमित शाह हे खोटे बोलतात - कलावती बांदूरकर

राहुल गांधींनी सांगितली करुण कहाणी : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज संसदेत राहुल गांधी यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला. राहुल गांधी कलावती नामक महिलेच्या घरी गेले आणि तिची करुण कहाणी त्यांनी संसदेत सांगितली. मात्र आज त्याच कलावतीबाईंना मोदी सरकारने वीज, घर, शौचालय, धान्य आणि आरोग्य या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्याची माहिती अमित शाह यांनी संसदेमध्ये अविश्वास प्रस्तावाच्या चर्चेत दिली.

काँग्रेस काळात मिळाले घर आणि साहित्य : काँग्रेस नेते राहुल गांधी हे यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील जवळका या गावातील कलावती बांदूरकर यांच्या घरी आले होते. या महिलेच्या घरी काँग्रेसने भरीव मदत दिली आहे. काँग्रेसच्या काळात आम्हाला घर आणि साहित्य मिळाल्याची माहिती कलावती बांदूरकर यांनी दिली. त्यामुळे कलावती बांदूरकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना खोटे पाडले आहे.

राहुल गांधी आणि अमित शाहांमध्ये वाद : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कलावती बांदूरकर यांच्या घरी भेट दिली होती. त्यामुळे कलावती बांदूरकर यांची कहाणी त्यांनी संसदेत सांगितली होती. मात्र अमित शाह यांनी राहुल गांधी यांची खिल्ली उडवत त्या महिलेला मोदी सरकारने मदत केल्याचा दावा केल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. संसदेतील अविश्वास प्रस्तावाच्या भाषणात अमित शाह यांनी हा दावा केल्याने वादाला तोंड फुटले आहे.

कोण आहेत कलावती बांदूरकर? - यवतमाळमधील कलावती यांच्या पतीने 2008 मधील दुष्काळग्रस्त परिस्थितीमुळे आत्महत्या केली होती. यानंतर राहुल गांधी यांनी कलावती यांना आधार देण्यासाठी त्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती. कलावती यांनी 2009 साली महाराष्ट्रामधील विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणा केली होती. मात्र, त्यानंतर त्यांनी आरोग्याच्या कारणामुळे निवडणूक न लढण्याचा निर्णय जाहीर केला होता. 2011 मध्ये कलावती यांची विवाहित मुलगी सविता खमणकरनेही आत्महत्या केली होती. चंद्रपूरमधील वरोराजवळच्या राडेगाव येथे राहणाऱ्या सविताने स्वत:ला जाळून घेतले होते. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात कलावती राहुल गांधींना भारत जोडो यात्रेदरम्यान भेटल्या होत्या.

हेही वाचा -

  1. Amit Shah : शरद पवारांचा उल्लेख करून अमित शाहांचा सुप्रिया सुळेंना टोला, म्हणाले..
  2. Monsoon Session 2023 : मोदींची तोफ आज धडाडणार, अविश्वास प्रस्तावावरील चर्चेला ४ वाजता संसदेत देणार उत्तर

Last Updated : Aug 10, 2023, 3:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.