यवतमाळ - जिल्ह्यातील १७ बाजार समित्यांमध्ये विक्री करण्यासाठी आणलेल्या शेतमालाला व्यापारी वाटेल तो भाव लावून खरेदी करत असल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यातील १७ ही बाजार समित्यांमध्ये हा प्रकार सुरू असून याकडे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे मोठी लुबाडणूक सुरू असल्याचा संताप बळीराजाकडून व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा - Hong Kong Open : सायना नेहवालसह समीर वर्मा पहिल्या फेरीत बाद
समितीचा संपूर्ण व्यवहार येथील व्यापाऱ्यांना धरूनच होत असल्याची तक्रार शेतकरी करत आहेत. हा शेतमाल येथे विकला गेला नाही तर, कुठेच विकला जाणार नाही, अशी तंबीही व्यापारीवर्गाकडून देण्यात येत आहे. घाटंजी येथील जिनीगंमध्ये बिना मापारी समितीतीचे कर्मचारी कापूस तोलून घेत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कापसाला ४००० हजार ते ४३०० पर्यंतच भाव मिळत असल्याने शेतीचा खर्च कसा भरून काढायचा? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.