ETV Bharat / state

रोहित्राने अचानक घेतला पेट; यवतमाळच्या खडकी गावातील घटना

सकाळी अकरा वाजताच्या सुमारास या रोहित्राने स्पार्किंगमुळे अचानक पेट घेतला. पाहता पाहता या रोहित्राने चांगलाच भडका घेतला. गावकऱ्यांनी या आगीची माहिती वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांना देताच ते घटनास्थळी हजर झाले. नंतर ही आग विझवण्यात आली.

electric transformer catches fire in khadki village of yavatmal
अचानक रोहित्राने घेतला पेट; यवतमाळच्या खडकी गावातील घटना
author img

By

Published : Jan 7, 2021, 3:18 AM IST

यवतमाळ - जिल्ह्यातील अती दुर्गम भागात असलेल्या झरीजामनी तालुक्यातील मुकुटबन जवळील खडकी या गावात रोहित्राने (ट्रान्सफॉर्मर) अचानक पेट घेतला. बघता बघता आगीने रौद्र रूप धारण केले. हे रोहित्र अगदी गावाला आणि रस्त्याला लागून असल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. वेळीच गावकऱ्यांनी प्रसंगावधान दाखवत ही आग विझवली.

रोहित्राने अचानक घेतला पेट

व्यवस्थित देखभाल करण्याची मागणी -

सकाळी अकरा वाजताच्या सुमारास या रोहित्राने स्पार्किंगमुळे अचानक पेट घेतला. पाहता पाहता या रोहित्राने चांगलाच भडका घेतला. गावकऱ्यांनी या आगीची माहिती वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांना देताच ते घटनास्थळी हजर झाले. नंतर ही आग विझवण्यात आली. गाव अगदी जवळ असल्याने ही आग गावापर्यंत पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली होती. पण सुदैवाने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. वीज कंपनी या रोहित्राची व्यवस्थित देखभाल करीत नसल्याने ही आग लागल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.

electric transformer catches fire in khadki village of yavatmal
यवतमाळच्या खडकी गावात रोहित्र पेटले

हेही वाचा - बाळासाहेब थोरातांकडेच राहणार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.