यवतमाळ - राळेगाव तालुक्यातील बोरजई ते बरडगाव पांदण रस्ता संपूर्ण खराब झाला होता. परंतु त्याकडे कोणत्याही लोकप्रतिनिधीने लक्ष दिले नाही. अखेर या पांदण रस्त्यावर शेती असलेल्या शेतकऱ्यांनी लोकवर्गणीतून व लोकसहभागातून पांदण रस्त्याच्या कामाला सुरुवात केली. याचे उद्घाटन तहसीलदार डॉ. रविंद्रकुमार कानडजे यांचे हस्ते करण्यात आले.
बरडगाव-बोरजई गावकऱ्यांनी बांधला लोकवर्गणीतून पांदण रस्ता गावकऱ्यांची वारंवार रस्त्याची मागणीराळेगाव येथील शासकीय ठेकेदार राजेंद्र दुधपोळे यांनी जेसेबी मशीन देऊन शेतकऱ्यांना एक मदत केली. पावसाळ्यात या रस्त्यावरून शेतात जाण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी अडचण निर्माण होत होती. शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी यांना वारंवार निवेदने देऊनही कुठल्याच प्रकारची दखल घेतली नाही. त्यामुळे या दोन्ही गावातील शेतकरी एकत्र येत या पांदण रस्त्याच्या कामाला सुरुवात केली.
लोकवर्गणीतून दीड लाख जमा
गावकऱ्यांनी लोकवर्गणीतून जवळपास दीड लाख जमा केले. ही रक्कम जमा करण्यासाठी विजय सोनाळे, शेखलाल सोनाळे, संजय सोनाळे, गोविंद शिंदे, प्रविण नेहाने, संदिप उईके, शुभाष सोनाळे तसेच गावकऱ्यांनी प्रयत्न केले. या रस्त्यावर पालकमंत्री पांदण रस्ता योजनेअंतर्गत खडीकरण करून द्यावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.हेही वाचा - 'लाल किल्ल्यातील घटनेआडून सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या नाकारू शकत नाही'