वाशिम - कोरोना संसर्गामुळे एक वर्षांपासून बंद असलेले कोचिंग क्लासेस सुरू करण्याची परवानगी द्यावी. यासाठी आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.
जिल्ह्यातील 300 कोचिंग क्लासेस व अभ्यासिका वर्षभरापासून बंद असल्याने कोचिंग क्लास चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळं लग्न समारंभ, बस, रेल्वे व आस्थापनांमध्ये ज्याप्रकारे 25 लोकांची परवानगी कोरोनाच्या नियम व अटी नुसार प्रदान करण्यात आली,त्याच धर्तीवर आम्हाला ही परवानगी द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
वाशिम जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस यांनी जिल्ह्यात संचारबंदी लागू केली आहे. मात्र, तरीही जिल्ह्यात दररोज शंभरच्यावर कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत.