वाशिम - जिल्ह्यात खरीप हंगामातील पेरण्या जवळपास 85 टक्के आटोपल्या आहेत. वाशिम जिल्ह्यातील शेतकरी राजेश जहीरव यांनी त्यांच्या आठ एकर शेतातील पिकांमध्ये असलेल्या तणावर नियंत्रण मिळवण्यासाठी तण नाशकाची फवारणी केली होती. मात्र, या तण नाशकामुळे शेतातील सोयाबीन आणि तूर पीक करपले आहे.
हेही वाचा... विठ्ठला, राज्यासह जगाला कोरोनामुक्त कर; मुख्यमंत्र्याचे विठ्ठलाला साकडे
मालेगाव तालुक्यातील केळी येथील शेतकरी राजेश जहीरव यांनी मालेगाव शहरातून अमेज कंपनीचे तणनाशक आणले होते. त्याची त्यांनी आठ एकर क्षेत्रात फवारणी केली होती. औषध फवारणी करताना त्यांनी योग्य प्रमाण वापरून फवारणी केली होती.
परंतु, या औषधाचा विपरीत परिणाम झाल्याने आठ एकरातील सोयाबीन आणि तूर पीक करपले आहे. शेतातील सर्व पिकांची मुळे काळे पडली असून पिकांनी माना टाकायला सुरूवात केली आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून त्यांनी पंचनामा करून तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.