वाशिम - राज्यसरकार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करणारच आहे. शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीकविमा काढला, मात्र जिल्ह्यात पीकविमा कंपनीकडून शेतकऱ्यांना उडवाउडवीचे उत्तर दिली जात आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीकविमा 15 नोव्हेंबरपर्यंत मंजूर करुन द्या, अन्यथा 15 नोव्हेंबरला जिल्ह्यातील पीकविमा कंपनीच्या कार्यालयास शिवसेना घेराव घालणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.
वाशिम जिल्ह्यात यंदा परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकाचे नुकसान केले आहे. आज (दि. 26 ऑक्टोबर) शिवसेनेच्या नेत्या खासदार भावना गवळी यांनी जिल्ह्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या पिकाची पाहणी केली.
जोपर्यंत शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही तोपर्यंत सुस्त बसणार नसल्याचे शिवसेना नेत्या खासदार भावना गवळी यांनी सांगितले. वाशिम जिल्ह्यातील वारा, अनसिंग, कुभी या परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात पाहणी करण्यासाठी गेल्या असता बोलत होत्या.
हेही वाचा - वाशिम : विविध मागण्यांसाठी वैदर्भीय नाथ जोगी समाजाचे 'भिक्षा मांगो' आंदोलन