वाशिम- कोरोना संसर्ग टाळण्यासाठी यावर्षी महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६० वा वर्धापन दिन आज वाशिम येथे अत्यंत साधेपणे साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालय येथे झालेल्या या कार्यक्रमात जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
हेही वाचा-COVID-19: मागील २४ तासात देशभरात १ हजार ८२३ रुग्ण; एकूण कोरोनाबाधित ३३ हजार ६१०
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, जिल्हा पोलीस अधिक्षक वसंत परदेशी यांच्यासह निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, अतिरिक्त पोलीस अधिक्षक विजयकुमार चव्हाण, जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र जाधव, तहसीलदार प्रशांत जाधव उपस्थित होते.