ETV Bharat / state

बंजारा समाजाचे धर्मगुरू रामराव महाराज अनंतात विलिन

श्वसनाचा त्रास सुरू झाल्याने मागील काही महिन्यांपासून लिलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी त्यांची प्राणज्योत मालवली.

author img

By

Published : Nov 1, 2020, 3:04 PM IST

Updated : Nov 1, 2020, 4:27 PM IST

dr ramrav maharaj funeral
रामराव महाराज अनंतात विलिन

वाशिम - बंजारा समाजाचे धर्मगुरू डॉ. रामराव महाराज यांना हजारो भक्तांच्या उपस्थितीत पोहरादेवीच्या मंदिर परिसरात दुपारी एक वाजता निरोप दिला. यावेळी परिवारातील सदस्यांनी रामराव महाराजांच्या पार्थिवाला अग्नी दिला. तपस्वी रामराव महाराज यांचे अंत्यसंस्कार शासकीय इतमामात पार पडले. यावेळी अनेक आजी माजी लोकप्रतिनिधी, सह समाजाचे महंत तसेच हजारो भक्तांच्या उपस्थितीत अंतिम संस्कार पार पडले.

बंजारा समाजाचे धर्मगुरू रामराव महाराज अनंतात विलिन

महाराज अनंतात विलिन

श्वसनाचा त्रास सुरू झाल्याने मागील काही महिन्यांपासून लिलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यावेळी त्यांच्या सोबत महंत शेखर महाराज व राष्ट्रीय बंजारा परिषदचे राष्ट्रीय अध्यक्ष किशन राठोड होते.

12 वर्षे मौनधारणा

बंजारा समाजाचे रामराव बापू महाराज यांचा जन्म 7 जुलै 1935ला पोहरादेवी येथे झाला होता. रामराव बापू महाराज यांना पोहरादेवी येथील संत सेवालाल महाराज यांच्या गादीवर परिसरातील 52 गावाच्या नाईक यांनी संत परशराम महाराज शिवलिन झाल्यावर वयाच्या 14व्या वर्षी 1948मध्ये बसविले. 12 वर्ष अनुष्ठान आणि 12 वर्ष मौन धारण केल्यावर रामराव महाराज यांनी देश भ्रमण सुरू केले. बंजारा समाजाचे धर्मगुरू डाॅ. रामराव महाराज यांनी कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री 11 वाजता जगाचा निरोप घेतला.

Last Updated : Nov 1, 2020, 4:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.