ETV Bharat / state

नागरतास येथील प्रमिला देवळे खून प्रकरणाचा उलगडा; सुनेनेच केली हत्या - Pramila Deole murder case at Nagartas

मालेगाव तालुक्यातील नागरतास येथील 55 वर्षीय प्रमिला देवळे यांची हत्या झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी श्वान पथकाच्या मदतीने केलेल्या तपासात सून मुख्य सूत्रधार निघाल्याची माहिती समोर आली आहे.

washim
पोलिसांनी अटक केलेला आरोपी
author img

By

Published : Mar 10, 2021, 6:23 PM IST

Updated : Mar 10, 2021, 6:31 PM IST

वाशिम - मालेगाव तालुक्यातील नागरतास येथील 55 वर्षीय प्रमिला देवळे यांची हत्या झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी श्वान पथकाच्या मदतीने केलेल्या तपासात सून मुख्य सूत्रधार निघाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, मालेगाव पोलिसांनी सून रेखा देवळे आणि साथीदार डिगांबर देवळे यांना अटक केली असून,न्यायालयाने त्यांना 13 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याचे पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी सांगितले आहे.

पोलीस अधीक्षक वसंत परदेशी

हेही वाचा - युती सरकारच्या ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेच्या चौकशीसाठी समिती जाहीर

मालेगाव शहराजवळून अवघ्या तीन किमी अंतरावर असलेल्या नागपूर-मुंबई या महामार्गावरील ग्राम नागरदास येथील प्रमिलाबाई केशव देवळे या महिलेचा खून झाला असल्याची माहिती तिची सून रेखा विजय देवळे हिने 9 मार्च रोजी सकाळी साडे सात वाजताच्या दरम्यान मालेगांव पोलिसांना दिली. त्यावरून ठाणेदार आधारसिंग सोनवणे यांनी आपल्या लवाजम्यासह घटनास्थळ गाठून चाचपणी केली असता, सदर वृद्ध महिलेच्या गळ्याला दोरी आवळून खून करण्यात आला असल्याचे दिसून आले. व आरोपी अज्ञात असल्याने मालेगाव पोलिसांनी तपासाची तात्काळ फिरवीत श्वानपथकासह फॉरेनसीस लॅबचे पथक नागरदास येथे पाचारण केले. श्वान पथकाच्या दिशादर्शक हालचालीवरून मृतक प्रमिला केशव देवळे यांची सून रेखा विजय देवळे हिच्यावरच संशय आला. त्यावरून मालेगाव पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन सखोल विचारपूस केली असता रेखा विजय देवळे हिनेच आपली सासू प्रमिलाबाईचा काटा काढला असल्याचे प्राथमिक चौकशीतून दिसून आले.

हेही वाचा - तीरथसिंह रावत होतील उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री, आजच शपथविधी

प्रमिलाबाई केशव देवळे या महिलेच्या नांवाने कौटुंबिक शेत जमीन होती. सदर जमीन रेखा विजय देवळे ही त्यांची सूनच वहिवाटदार होती. काहीच महिने अगोदर विजय केशव देवळे याचा नागरदास येथेच खून झाला होता. त्यानंतर सदर जमिनी स्वतःच्या नांवाने करून घेण्यासाठी रेखा विजय देवळे या महिलेचे तिची सासू प्रमिलाबाई केशव देवळे यांच्याशी खटके उडत होते. त्यामुळे प्रमिलाबाई तिचा काटा काढून वारसाहक्काने जमीन स्वतःचे नावाने करून घेण्यासाठी रेखा विजय देवळे हिने तिची सासू परमिला बाई केशव देवळे या महिलेचा 9 मार्च रोजी गावालगतच्या हागंदरीमध्ये शौच्छास गेली असता तिचा दोरीने गळा आवळून खून केला असल्याची प्राथमिक माहिती मालेगांव पोलिसांच्या हाती लागली. अवघ्या बारा तासाच्या आत मालेगांव पोलिसांनी आरोपी रेखा विजय देवळे व तिच्या संपर्कात असलेल्या डिगांबर अवधूत देवळे या दोघांना भादंविच्या कलम 302 अन्वये काल रात्री उशीरा अटक केली आहे. आरोपी रेखा विजय देवळे व डिगांबर अवधूत देवळे या दोघांना पोलीस कोठडी करिता न्यायालयात हजर करणार आले असून 13 पोलीस कोठडी देण्यात आली.

Last Updated : Mar 10, 2021, 6:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.