वाशिम - महावितरणच्या गलथान कारभाराचे नमुने नेहमीच पाहायला मिळत असतात. शेती पंपासाठी वीजपुरवठा करणार्या वीजवाहक तारा कायम शेतात लोंबकळत असतात. अशा तारांमुळे दुर्घटना घडण्याचे प्रकार वाढत आहेत. वाशिम जिल्ह्यातील चोरद येथील नवनाथ गुठे यांच्या शेतातील वीजवितरण कंपनीच्या तारा शेतात लोंबकळल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात काम करणे अवघड झाले आहे.
शेतातील विजेचे खांब सरळ करण्यासाठी वीजवितरण कंपनीला निवेदन दिले आहे. मात्र, वीजवितरण कंपनी याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी विजेचे खांब सरळ करून द्यावें, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.