ETV Bharat / state

मालेगाव-मेहकर मार्गावर कार, ट्रॅक्टरचा भीषण अपघात; एक ठार एक जखमी

पांगरी कुटे दरम्यान ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात मारुती कारणे ट्रक्टरला मागुन जोरदार धडक दिली.

अपघात
author img

By

Published : Jun 4, 2019, 11:15 PM IST

वाशिम - ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात मारुती कार व ट्रॅक्टरमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात अकोला येथील एक डॉक्टर जागीच ठार झाले तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. मालेगाव-मेहकर मार्गावरील वडप ते पांगरी कुटे गावादरम्यान हा अपघात झाला.

अकोला येथील डॉ. सुधीर ठाकरे आणि डॉ. अशोक ठाकरे हे आपली मारुती सुझुकी गाडी क्रमांक (एम. एच ३० ए. ए ६८५) मधून मेहकरवरून अकोल्याकडे जात होते. पांगरी कुटे दरम्यान ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात मारुती कारणे ट्रक्टरला मागुन जोरदार धडक दिली. यावेळी झालेल्या अपघातामध्ये डॉ. अशोक ठाकरे हे जागीच ठार झाले तर सुधीर ठाकरे हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमी सुधीर ठाकरे यांना अकोला येथे उपचाराकरिता हलविण्यात आले आहे.

Intro:वाशिम : ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात मारुती कार व ट्रॅक्टर मध्ये अचानक झालेल्या अपघातामध्ये अकोला येथील एक डॉक्टर जागीच ठार झाला तर एक गंभीर झाल्याची घटना मालेगाव मेहकर मार्गावरील वडप ते पांगरी कुटे दरम्यान घडलीय

Body:अकोला येथील डॉ सुधीर ठाकरे डॉ अशोक ठाकरे हे आपली मारुती सुझुकी गाडी क्रमांक एम एच 30 ए ए 685  मधून मेहकर वरूनअकोला कडे जात असताना समोर असलेले ट्रॅक्टर  मागे वखर यंत्र लावलेला मालेगाव कडे येत असताना पांगरी कुटे दरम्यान ट्रॅक्टर ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात मारुती कारणे जोरदार धडक दिली यामध्ये झालेल्या अपघातांमध्ये डॉक्टर अशोक ठाकरे हे जागीच ठार झाले तर सुधीर ठाकरे हे गंभीर जखमी झाले गंभीर जखमी सुधीर ठाकरे यांना अकोला येथे उपचाराकरिता रेफर करण्यात आले होते सदर वृत्त लिहेपर्यंत याबाबत मालेगाव पोलिस स्टेशनला तक्रार दाखल झाली नव्हती..Conclusion:फीड : सोबत आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.