ETV Bharat / state

जिल्ह्यातील 12 ग्रामपंचायतीत सरपंच पदाच्या आरक्षणानुसार उमेदवारच नाही - washim district news

वाशिम जिल्ह्यातील 163 ग्रामपंचायतचे आरक्षण बुधावारी (दि. 3 फेब्रुवारी) जाहीर झाले. यामध्ये 12 ग्रामपंचायतीत आरक्षण निघालेल्या प्रवर्गातील उमेदवारच नसल्याने सरपंच पदासाठी पेच निर्माण झाला आहे.

छायाचित्र
छायाचित्र
author img

By

Published : Feb 4, 2021, 10:29 AM IST

Updated : Feb 4, 2021, 11:16 AM IST

वाशिम - जिल्ह्यातील 163 ग्रामपंचायतचे आरक्षण बुधावारी (दि. 3 फेब्रुवारी) जाहीर झाले. यामध्ये 12 ग्रामपंचायतीत आरक्षण निघालेल्या प्रवर्गातील उमेदवारच नसल्याने खळबळ उडाली आहे. मालेगाव तालुक्याच्या वसारी व राजूरा ग्राम पंचायत सरपंच पदाचे आरक्षण अनूसूचीत जमाती प्रर्वगाचे निघाले आहे. मात्र, या दोन्ही गावात या प्रर्वगाचा उमेदवारच नसल्याने ग्रामपंचायत सरपंच पदासाठी पेच निर्माण झाला आहे.

जिल्ह्यातील 12 ग्रामपंचायतीत सरपंच पदाच्या आरक्षणानुसार उमेदवारच नाही

वाशिम जिल्ह्यात 15 जानेवारीला पार पडलेल्या ग्रामपंचायतचे निवडणूकीनंतर सरपंच पदासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. यामध्ये मालेगाव तालुक्यातील वसारी, राजूरा, पांघरी कुटे, शिरसाळा, मारसुळ, वारंगी, रिसोड तालुक्यातील चिचांबा भर, बिबखेड, मोठेगाव, वाशिम तालुक्यातील उकळी पेण तर कारंजा तालुक्यातील सोमठाणा या 12 गावासाठी आरक्षित प्रवर्गातील उमेदवारच नसल्याने सरपंचपद कोणाला मिळणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

शासनाकडे प्रस्ताव पाठवणार

या संदर्भात तहसीलदार मालेगाव यांना विचारले असता आरक्षण न्यायालयाच्या आदेशानुसारच काढण्यात आले असून, तालुक्यातील वसारी आणि राजुरा येथे आरक्षित प्रवर्गातील उमेदवार नसल्याने आम्ही हा प्रस्ताव वरच्या स्तरावर पाठविणार असल्याचे तहसीलदार यांनी सांगितले आहे.

निवडून आलेल्या सदस्यांपैकी आरक्षण काढावे

राजुरा गावात निघालेल्या आरक्षित प्रवर्गातील उमेदवार नसल्याने आमच्या गावात सरपंच पद कोणाला मिळणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आरक्षण बदलून आमच्या गावात निवडून आलेल्या 9 सदस्यांपैकी एक आरक्षण काढावे, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.

आरक्षण रद्द करण्याची मागणी

वसारी गावात 9 सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतीत अनुसूचित जमातीचा उमेदवारच नाही आणि निवडणुकीनंतर सरपंच पदाचे आरक्षण अनुसूचित जमातीसाठी निघाला आहे. यामुळे गावात निवडून आलेल्या सदस्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे आमच्या गावातील आरक्षण रद्द करून इतर प्रवर्गातील आरक्षण काढावे, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.

हेही वाचा - ...तर जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचा 30 टक्के पगार त्यांच्या पालकांच्या खात्यात होणार जमा

Last Updated : Feb 4, 2021, 11:16 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.