वाशिम - जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील सोमठाणा तांडा येथील 22 वर्षीय युवकाचा तलावात बुडून मृत्यू झाला. राम दयाराम चव्हाण (वय 22) असे मृत युवकाचे नाव आहे. हा युवक सोहम नाथनगर तलावात बुधवारी दुपारी पोहण्यासाठी गेला होता.
याची माहिती तालुका आपत्ती व्यावस्थापनाला दिली. मात्र, त्यांच्याकडून कोणताच प्रतिसाद न मिळाल्याने ग्रामस्थांनी पाण्यात उतरून शोध घेतला. मात्र, त्यांना युवकाचा शोध लागला नाही. यानंतर वानोजा येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या बचाव दलाला या घटनेची माहिती देण्यात आली. या पथकाने घटनास्थळी येऊन मृतदेह बाहेर काढला. यावेळी दयारामला पोहता येत होते. मात्र, तो मध्यभागी गेल्यानंतर थकल्याने बुडाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.