वर्धा- सेवाग्राम आश्रम सत्य आणि अहिंसेचे प्रार्थना स्थळ आहे. सध्या आश्रमात निरव शांतता आहे. १९३६ मध्ये निर्माण झालेले हे आश्रम आजतागायत बंद झाले नाही. पण, लॉकडाऊनच्या काळात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी हे आश्रम बंद करण्यात आले. या काळात आश्रमाला पर्यटनापासून मिळणारी मिळकत थांबल्याने जवळपास ४० लाखाचा फटका बसल्याचे बोलले जात आहे.
सेवाग्राम आश्रम मार्च महिन्यापासून बंद करण्यात आले. या काळात उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये देशभरातून नागरिक आश्रमाला भेट द्यायला येतात. शाळेच्या सहली या ठिकाणी होतात. महात्मा गांधींचे विचार, हाडा मासाचा मानूस ज्याने कुठलेही शस्त्र न घेता देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्या महात्म्याची ताकद, सत्य व अहिंसा समजण्यासाठी नागरिक या आश्रमात येतात. खास करून परदेशातील मंडळी महात्मा गांधींच्या विचारांचा आभ्यास करण्यासाठी या ठिकाणी येतात. मात्र, लॉकडाऊनमुळे हे सर्व बंद झाले आहे.
सेवाग्राम आश्रमाला 'यातून' मिळतो आधार..
शेतीतून आश्रमाला मदत होते. यातून मिळणारे अन्न, धान्य, वस्तू यासह काही देणगीदारांकडूनही मदत होते. सेवाग्राम आश्रमाचे आहार केंद्र, यात्री निवास, पुस्तकालय, खादी उत्पादन वस्त्र, गोशाळा अशे मिळकतीचे स्रोत आहे. पण, पर्यटक किंवा दर्शनार्थी न आल्याने मोठ्या प्रमाणात तूट झाली असल्याची माहिती आश्रम प्रतिष्ठानचे सचिव मुकुंद मस्के यांनी दिली.
दरवर्षी 'इतके' लोक देतात भेटी..
दरवर्षी सेवाग्राम आश्रमाला साधारण ४ ते ५ लाख पर्यटक भेटी देतात. यामध्ये विदेशी पर्यटकांचासुद्धा समावेश आहे. गांधीजींना समजून घेणे, त्यांची दिनचर्या जाणून घेण्यासाठी पर्यटक यात्री निवासात मुक्काम करतात. यात्री निवासात जेवणाचीही व्यवस्था आहे. येथे जवळपास ४ ते ५ हजार विदेशी पर्यटक येतात, आणि अभ्यासासाठी राहतात. पण, लॉकाडाऊनमुळे ना कोणी आले, ना थांबले. यामुळे आश्रमाचे चालणारे अर्थचक्राचे चाक फिरलेच नाही.
गाईडकडून लुबाडणूक होत नाही..
इतर ठिकाणी ज्या प्रमाणे पर्यटकांकडून माहिती किंवा खाद्य पदार्थांच्या विक्रीतून लुबाडणूक होते, तसा प्रकार येथे नाही. आश्रमातील गाईड त्यांना मोफत आश्रम परिसराविषयी माहिती देताता. परिसरात दान पेटी आहे. यामुळे ज्यांना मदत करूशा वाटते ते स्वेच्छने दान पेटीत पैसे टाकून मदत करतात. यासह विक्री आणि इतर वस्तूही विना अतिरिक्त शुल्क घेता विकल्या जातात. तसेच, विचारांच्या आधारावर विश्वासार्हता टिकून आहे.
पर्यटनाला चालना देण्यासाठी मोठ्या प्रमाणात विकासकामे केली जात आहे. यासह चारखाघर, आयुष्याचे चित्रप्रदर्शन ज्यामध्ये महात्मा गांधी आणि विनोबाचे शिल्प तयार करण्यात आले आहे. यासह अनेक कामे पर्यटनाला चालना मिळण्यासाठी सेवाग्राम विकास अरखड्यांतर्गत करण्यात आली आहे. काही कामे अजूनही सुरूच आहे. त्यांचे लवकरच लोकार्पण होईल, अशी आशा व्यक्त होत आहे.
हेही वाचा- निर्यातबंदी मागे घेण्याच्या निवेदनासह खासदारांना कांदा भेट