वर्धा - जिल्ह्यात कोरोनाबाधित असा एकही रुग्ण सापडलेला नाही. सुरुवातीपासून अनेक उपाययोजना राबवत जिल्हा प्रशासनाने खबरदारी म्हणून पाऊले उचलली आहेत. याचाच परिणाम लॉकडाऊनच्या दोन आठवड्यानंतर दिसू लागला आहे. जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्याने अद्याप एकही रुग्ण आढळला नसल्याने पालकमंत्री सुनील केदार यांनी प्रशासकीय यंत्रणेचे कौतुक केले आहे.
दहा हजार प्रवासी गृह विलगीकरणातून बाहेर, परदेशातून आलेले ११४ प्रवासी निगेटिव्ह
जिल्ह्यात परदेशातून आलेल्या 114 जणांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. काहींना लक्षणे दिसताच खबरदारी म्हणून त्यांचे स्वॅब सुद्धा तपासणीसाठी पाठवलेले होते. त्यांचे स्वॅब 'निगेटिव्ह' आले असल्याने ते सर्व रुग्ण विलगीकरणातून बाहेर पडले आहेत.
ten thousand people completed isolation period in dhule
वर्धा - जिल्ह्यात कोरोनाबाधित असा एकही रुग्ण सापडलेला नाही. सुरुवातीपासून अनेक उपाययोजना राबवत जिल्हा प्रशासनाने खबरदारी म्हणून पाऊले उचलली आहेत. याचाच परिणाम लॉकडाऊनच्या दोन आठवड्यानंतर दिसू लागला आहे. जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्याने अद्याप एकही रुग्ण आढळला नसल्याने पालकमंत्री सुनील केदार यांनी प्रशासकीय यंत्रणेचे कौतुक केले आहे.
जिल्हा प्रशासनाने जेव्हा मुंबई, पुणे या शहरातून आलेले प्रवाशांची माहिती गोळा केली. यावेळी एकूण 15 हजार 902 प्रवाशांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले. यातील 10 हजार 481 जणांचा 14 दिवसांचा होम क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाला आहे. 4 हजार 421 जणांचा कालावधी अजूनही बाकी असल्याने त्यांना घरात ठेवण्यात आले आहे. 9 जणांना खबरदारी म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालयात आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.