वर्धा - आष्टी पोलीस ठाण्यांतर्गत जोलवाडी शिवारात मिळालेल्या महिलेच्या हत्येचा अखेर स्थानिक गुन्हे शाखेने छडा लावला. मारेकऱ्याचे लग्न होणार असल्याने अडसर ठरणाऱ्या अनैतिक संबंध असलेली महिलेची हत्या केल्याचे उघडकीस आहे. यामुळे त्या महिलेची हत्या केल्यानंतर लग्न केले. गौरव देशमुख (वय. 33 रा. गोरेगाव अमरावती) असे आरोपीचे नाव आहे. बेबी घोरपडे (वय.43) चीचगव्हाण असे मृत महिलेचे नाव आहे.
अमरावती आणि वर्धा जिल्ह्याच्या सीमेवरील शिंभोरा धरणाच्या पायथ्याशी जंगलात एक अज्ञात महिलेचा जळलेला कुजलेला मृतदेह 22 जूनला आढळला. कुठलीच ओळख पटत नसल्याने तपास स्थानिक गुन्हे शाखेने सुरू केला. स्थानिक गुन्हे शाखाने मिसिंगच्या शोधात मध्यप्रदेशात जाऊन आले. जवळपास 1400 किलोमीटर पालथे घातल्यानंतर एक सुगावा हाती लागला. एका महिलेच्या मिसिंगच्या तक्रारारिवरून तपासाला दिशा मिळाली. तीच महिलाच मृत असल्याचे पुढे आले. या महिलेचे नाव होते बेबी घोरपडे (वय.43, रा.चीचगव्हाण अमरावती) असे मृतक महिलेचे नाव आहे. या महीलेला दोन मुली असून एक मुलगा आहे. पती आजाराने आठ वर्षांपूर्वीच मरण पावले आल्याचेही तपासत पुढे आले आहे.
लग्न केल्यास धिंगाणा करण्याची धमकी बेतली जीवावर -
बेबी आणि गौरव देशमुखचे मागच्या दोन वर्षांपासून सूत जुळले होते. दोघांचे प्रेमसंबंध चांगलेच वाढले. गौरव लग्न करणार असल्याने त्यांच्यात वाद सुरू झाले. लग्न केल्यास धिंगाणा घालण्याची धमकी बेबी देत होती. लग्न झाले तर आपले काय होणार म्हणून बेबीचा तगादा लावला होता. मात्र, जीवावर तोच तीच्या जीवावर बेतला. लग्नासाठी अरथडा ठरल्याने गौरवने काटा काढण्याचे ठरवले. तिला संपवण्याच्या कट रचला.
हत्येपूर्वी गौरव आणि बेबी दोघेही प्याले होते दारू -
मे महिन्यात 18 तारखेला तिला घेऊन तो निघाला. दारूची बॉटल त्याने सोबत घेतली. सोबत घेतलेली दारु बेबी आणि गौरवने रिचवली. याच्या डोक्यात काय आहे हे बेबीला कळले सुद्धा नाही. त्याने सोबतच 300 रुपयांचा चाकू विकत घेतला होते. जाळण्यासाठी दोन लिटर पेट्रोल सुद्धा घेतले. दोघेही दारू पिऊन परिसरात सोबत फिरले.
शिंभोरा जंगलात नेऊन केली हत्या -
दारूची नशा असल्याने बेबीला त्यांने अमरावतीला जाऊ म्हणत शिंभोऱ्याच्या जंगलाकडे आणले. तिथे त्याने शाररिक संबध ठेवल्यानंतर तिच्यावर चाकूने वार केले. ती ओरडल्याने तिच्या तोंडात दुपट्टा कोंबला आणि गळा आवळून तीची हत्या केली. यानंतर तीचा मृतदेह पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. घटनेनंतर सगळं संपले म्हणून त्याने 30 मे रोजी लग्न करत तो विवाह बंधनात अडकला. अवघा महिना जात नाही तेच जे अनैतिक संबंध लपवण्यासाठी आणि दुसरे लग्न करण्यासाठी हत्या केली. त्या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने कुठलाही पुरावा नसतांना या खुनाच्या गुन्ह्याला उघडकीस आणण्यात यश मिळवले.
1400 किमीचा प्रवासातून मिळाला सुगावा -
अज्ञात मृतदेह मिळाल्यावर सर्वात मोठीं अडचण होते ती मृत देहाची ओळख पटवण्याची. ही ओळख पटवणे सोपे नसतांना, कुठलाच सुगावा नसतांना तब्बल 1400 किलोमीटर स्थानिक गुन्हे शाखाने तीन दिवस रात्र फिरत हत्येचा सुगावा लावाला. मध्यप्रदेशासह आजू बाजूचे चारही जिल्हे पालथे घातले. यात प्रकरणातील वरुड पोलीस ठाण्यातील एक तक्रार हाती लागली आणि हत्या उघडकिस आली.
या खुनाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेने पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अपर पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक निलेश ब्राम्हणे, पोलिस उपनिरीक्षक महेन्द्र इंगळे, नामदेव किटे, नरेन्द्र डहाके, हरिदास काकड, वैभव कट्टोजवार, अमित शुक्ला, नितीन इटकरे दिनेश बोथकर, आत्माराम भोयर, मुकेश येल्ले यांनी प्रकारणाचा छडा लावत आरोपीला जेरबंद केले.