ETV Bharat / state

वर्धा : कोरोना प्रादुर्भावामुळे आर्वीच्या सहा डॉक्टरांना बाहेर जिल्ह्यातून ये-जा थांबवण्याच्या सूचना - wardha corona cases news

आर्वी शहरात कोरोनाच्या रुग्ण संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. सध्या रविवारपर्यंत संचारबंदी लागू आहे. यात शहरातील 6 खासगी डॉक्टर जे लगतच्या जिल्ह्यातसुद्धा सेवा देत आहेत. ते बाहेर जिल्ह्यातून येत असल्यामुळे काही नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे, त्यांना वैद्यकीय सेवा देण्यास थांबवण्यात आले नसून खबरदारी म्हणून ये-जा थांबवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

आर्वीच्या सहा डॉक्टरांना बाहेर जिल्ह्यातून ये जा थांबवण्याच्या सुचना

author img

By

Published : Jul 14, 2020, 8:40 PM IST

वर्धा : सध्या कोरोनाच्या काळात जिल्ह्यात सीमाबंदी करण्यात आली आहे. यातही वर्धा जिल्ह्यात रुग्णसंख्येचा आलेख वाढत चालला आहे. यामुळे खबरदारी म्हणून शहरातील 6 खासगी डॉक्टर जे लगतच्या जिल्ह्यातसुद्धा सेवा देत असल्याने ये-जा करतात. यामुळे उपविभागीय अधिकारी हरिष धार्मिक यांनी एक पत्र काढात डॉक्टरांनी रेडझोन जिल्ह्यातून होत असलेली ये-जा थांबवावी अशा सूचना एका पत्रातून दिल्या आहेत.

वर्धा जिल्ह्यातील आर्वी शहरात वैद्यकीय सेवा देणारे सहा डॉक्टर हे आठवड्यातील तीन ते चार दिवस आर्वी शहरात सेवा देतात. तर, बाकीचे दिवस हे लगतच्या जिल्ह्यामध्ये जाऊन वैद्यकीय सेवा देतात. लगतचे जिल्ह्यांमध्ये नागपूर असो की अमरावती हे रेडझोनमध्ये आहे. यामुळे आठवड्यातून एकदा त्यांना आर्वीमध्ये यावे लागते. बाहेर जिल्ह्यातून येताना नागरिकांना गृह विलगीकरणात ठेवण्यात येते. तेच वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टरांना यात मुभा देण्यात आली आहे. पण सध्या शहरात आणि जिल्ह्यात वाढती रुग्णसंख्या पाहता डॉक्टरांचे ये-जा सुरू असल्याने भीतीचे वातावरण पाहता काही तक्रारी उपविभागीय अधिकारी हरिष धार्मिक यांना प्राप्त झाल्या आहेत. यात दिलेल्या पत्रामध्ये तसा उल्लेखही करण्यात आला आहे. यामुळे वैद्यकीय सेवा देणाऱ्या 6 डॉक्टरांनी एक तर कायमस्वरुपी आर्वी शहरातच वैद्यकीय सेवा द्यावी, अथवा ज्या जिल्ह्यात ते इच्छूक आहेत तेथेच सेवा द्यावी. पण खबरदारी म्हणून आठवड्याला ये-जा थांबवण्याची सूचना या पत्रातून देण्यात आल्या आहेत.

आर्वी शहरात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली असून त्या पार्श्वभूमीवर रविवारपर्यंत संचारबंदी लागू आहे. यात हे डॉक्टर बाहेर जिल्ह्यातून येत असल्यामुळे काही नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यांना वैद्यकीय सेवा देण्यास थांबवण्यात आले नसून खबरदारी म्हणून ये-जा थांबवण्याच्या सूचना दिल्या आहेत. आजारी नागरिक हे खासगी रुग्णालयात जातात. ते पॉझिटिव्ह आढळून आल्याने रुग्णालय आणि डॉक्टरांनासुद्धा त्रास होतो. यामुळे खबरदारी म्हणून उपाययोजना करण्यात येत असल्याचे उपविभागीय अधिकारी हरिष धार्मिक यांनी सांगितले.

यात नियमित तपासणीला येणाऱ्या रुग्णाचे मोठ्या प्रमाणात फोन येत आहेत. पण या पत्रामुळे सेवा देण्यास अडचणी येत आहेत. डॉक्टर हे अत्यावश्यक सेवेत आणि नागरिकांना सेवा देण्यासाठी ये-जा करत आहे. यामुळे यावर पुर्नविचार करून मुभा देण्याची विनंती उपविभागीय अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांना करणार असल्याचे एका डॉक्टरानी सांगीतले. तसेच तक्रार करणाऱ्यांना सोडल्यास ज्या रुग्णांना वैद्यकीय सेवेची गरज आहे. या रुग्णाचाही विचार करणे गरजेचे असल्याचे काही नागरिकांचे म्हणणे आहे. या 6 डॉक्टरांमध्ये प्रसिद्ध डॉक्टर अविनाश लव्हाळे, डॉ. रोशन जवळेकर, डॉ. योगेश धर्मठोक, डॉ. अंकित मसराम, डॉ. उमेद राऊत, डॉ. आशिष चांदने यांचा समावेश आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.