ETV Bharat / state

वर्धा जिल्हा कृषी अधीक्षक विद्या मानकर यांची पालकमंत्र्यांकडून कानउघडणी - wardha

आत्महत्या करण्याची वेळ आली दोन मिनिटे एकूण घ्या, म्हटल्यानंतरसुद्धा वेळ नसल्याचे सांगणाऱ्या कृषी अधीक्षकांची ही वागणूक शेतकऱ्यांना अवाक करणारी होती. अशाच तक्रारींचा पाढा आज पालकमंत्री बावनकुळे यांच्यासमोर वाचला गेला.

जिल्हा कृषी अधीक्षक विद्या मानकर यांची पालकमंत्र्यांनी केली कानउघाडणी
author img

By

Published : Jul 13, 2019, 8:25 AM IST

Updated : Jul 13, 2019, 10:21 AM IST

वर्धा - मागील वर्षभरापासून अनेक कारणांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विद्या मानकर यांची वागणूक वादग्रस्त ठरली आहे. अनेक शेतकऱ्यांनी मानकर यांच्या विरोधात वरिष्ठांकडे तक्रारी केल्या आहेत. नवनियुक्त पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोर शुक्रवारी या तक्रारींचा पाढा वाचला गेला आणि ढीगभर तक्रारी पाहून पालकमंत्र्यांनी मानकर यांना चांगलेच फैलावर घेत खडे बोल सुनावले. तसेच त्यांच्याविरुद्ध लवकर कारवाई होईल, असेही त्यांनी सांगितले.

ज्यांच्यासाठी हा विभाग आहे, ज्यांच्या कामाकरिता इथली पदे आहेत, त्या शेतकऱ्यांनाच मानकर वेळ नसल्याचे सांगून भेटीसाठी टाळाटाळ करत होत्या. शेतकऱ्यांना वेळ नसल्याचे सांगणे आणि उर्मट भाषेचा उपयोग करणे, अशा अनेक तक्रारी त्यांच्या विरोधात करण्यात आल्या आहेत.

वर्धा जिल्हा कृषी अधीक्षक विद्या मानकर यांची पालकमंत्र्यांकडून कानउघडणी

पॉलिहाऊस आणि शेडनेटमुळे देशोधडीला लागलेले त्रस्त शेतकरी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विद्या मानकर यांना भेटायला गेले. मात्र, त्यांना वेळ नाही, असे सांगत सहा दिवसांनी या, असे लिखित स्वरुपात लिहून दिले. आत्महत्या करण्याची वेळ आली दोन मिनिटे एकूण घ्या, म्हटल्यानंतरसुद्धा वेळ नसल्याचे सांगणाऱ्या कृषी अधीक्षकांची ही वागणूक शेतकऱ्यांना अवाक करणारी होती. अशाच तक्रारींचा पाढा आज पालकमंत्री बावनकुळे यांच्यासमोर वाचला गेला. कृषी अधीक्षकांच्या गैरवागणुकीला अनेकांनी दुजोरा दिला. यावेळी एका बातमीचा उल्लेख करत बैठकीतच 21 विभागाचे प्रमुख उपस्थित असताना पालकमंत्र्यांनी त्यांची कानउघडणी केली. तसेच यापुढे, असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. याचा विचार करावा, अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी कृषी अधीक्षक विद्या मानकर यांना दिल्यात.

आमदारांनीही केली मुख्यमंत्र्यांकडे तक्रार -

जिल्हा कृषी अधीक्षक या शेतकऱ्यांनाच काय तर आमदार यांच्या सुचनेकडेही दुर्लक्ष करत असल्याचे बोलले जात आहे. वेळेवर माहिती न देणे, शेतकऱ्यांच्या प्रश्नांची माहिती देऊनही प्रतिसाद न मिळणे यासह अनेक शेतकऱ्यांनी वर्ध्याचे आमदार डॉ. पंकज भोयर आणि हिंगणघाट मतदारसंघाचे आमदार समीर कुणावर यांनासुद्धा तक्रारी केल्या होत्या. याची दखल घेत दोन्ही आमदारांनी मुंबईत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली असल्याचे यावेळी पत्रकारांना सांगितले. पुढील आठ दिवसात कारवाई होईल, अशी माहिती आमदार पंकज भोयर यांनी दिली.

कृषी अधीक्षकांनी सर्व काम बाजूला टाकून शेतकऱ्यांचे प्रश्न येताच प्राधान्य देणे अपेक्षित आहे. पण विद्या मानकर या कृषी अधीक्षक पदावर असून कार्यालयात आलेल्या शेतकऱ्यांना भेट न देता कामात आहे, वेळ नाही असे उत्तर देणाऱ्या कदाचित पाहिल्याच असाव्या. यामुळे याबाबत पालकमंत्री काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Intro:वर्धा
जिल्हा कृषी अधीक्षक विद्या मानकर यांची पालकमंत्र्यांनी केली कानउघाडणी

-आमदार डॉ पंकज भोयर आणि आमदार समीर कुणावार यांनीही मुख्यमंत्र्यांकडे केली तक्रार

वर्धा- मागील वर्षभरापासून येनकेन कारणाने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विद्या मानकर यांची वागणूक ही वादग्रस्त ठरलेली आहे. ज्यांच्यासाठी हा विभाग आहे, ज्यांच्या कामाकरिता इथली पद आहे, त्या शेतकऱ्यांनाच वेळ नसल्याचे सांगून भेटीसाठी ताटकळवणाऱ्या मानकर यांच्याविरोधात अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. शेतकऱ्यांना वेळ नसल्याचे सांगणे, उर्मट भाषेचा उपयोग करणे अश्या अनेक तक्रारी त्यांचा विरोधात करण्यात आल्या आहेत. याचा आज भडकाच उडालेला पाहायला मिळाला. नवनियुक्त पालकमंत्री यांच्यासमोर या तक्रारीचा पाढा वाचला गेला आणि ढीगभर तक्रारी पाहून पालकमंत्री यांनीही मानकर यांना चांगलेच फैलावर घेत खडे बोल सुनावले. त्यांच्याविरुद्ध लवकर कारवाई होईल, असे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विद्या मानकर यांना पॉलिहाऊस, शेडनेटमुळे देशोधडीला लागलेले त्रस्त शेतकरी भेटायला गेले. त्यांना वेळ नाही, असे सांगत तब्बल सहा दिवसांनी या असे लिखित स्वरूपात लिहून दिले. आत्महत्या करण्याची वेळ आली दोन मिनिटं एकूण घ्या म्हटल्यानंतरसुद्धा वेळ नसल्याचे सांगणाऱ्या कृषी अधीक्षकांची ही वागणूक शेतकऱ्यांना अवाक करणारी ठरली. अशाच तक्रारीचा पाढा आज पालकमंत्री बावनकुळे यांच्यासमोर वाचला गेला. कृषी अधीक्षकांच्या गैरवागणुकीला अनेकानी दुजोरा दिला. यावेळी एका बातमीचा उल्लेख घेत बैठकीतच 21 विभागाचे प्रमुख उपस्थित असताना त्यांची कानउघाडणी नवनियुक्त पालकमंत्री यांनी केली. तसेच यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नसून याचा विचार करावा, अशा सूचना पालकमंत्री बावनकुळे यांनी कृषी अधीक्षक विद्या मानकर यांना बैठककित दिल्यात.

आमदारांनीही केली मुख्यमंत्र्यांकडे तक्रार .....

जिल्हा कृषी अधीक्षक या शेतकऱ्यांनाच काय तर आमदार यांच्या सुचनेकडेही दुर्लक्ष करत असल्याचे बोलले जात आहे. वेळेवर माहिती न देणे, शेतकऱ्यांच्या प्रश्नांची माहिती देऊनही प्रतिसाद न मिळणे यासह अनेक शेतकऱ्यांनी वर्ध्याचे आमदार डॉ. पंकज भोयर आणि हिंगणघाट मतदारसंघाचे आमदार समीर कुणावर यांनासुद्धा तक्रारी केल्या होत्या. याची दखल घेत दोन्ही आमदारांनी मुंबईत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली असल्याचे यावेळी पत्रकारांना सांगितले. पुढील आठ दिवसात कारवाई होईल, अशी माहिती आमदार पंकज भोयर यांनी दिली.

कृषी अधीक्षकानी सर्व काम बाजूला टाकून शेतकऱ्यांचे प्रश्न येताच प्राधान्य देणं अपेक्षित आहे. पण विद्या मानकर या कृषी अधीक्षक पदावर असुन कार्यलयात आलेल्या शेतकऱ्यांना भेट न देता कामात आहे, वेळ नाही असे उत्तर देणाऱ्या कदाचित पाहिल्याच असाव्या. यामुळे याबाबत नवनियुक्त पालकमंत्री काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.Body:पराग ढोबळे,वर्धा.Conclusion:
Last Updated : Jul 13, 2019, 10:21 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.