ETV Bharat / state

आष्टी तहसीलदारांच्या दालनाला आग, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली !

सकाळी नियमितपणे कामकाज सुरू असताना अचानक आग लागल्याच्या घटनेने खळबळ उडाली. यावेळी तहसीलदार आशिष वानखडे यांच्यासह आरोग्य अधिकारी आणि काही कर्मचारी दालनात होते. सुदैवाने यात कोणाला दुखापत झाली नाही.

fire-at-tehsildar-office-in-ashti-in-wardha
आष्टी तहसीलदारांच्या दालनाला आग, थोडक्यात दुर्घटना टळली!
author img

By

Published : Oct 9, 2020, 4:36 PM IST

वर्धा - आष्टी तहसील कार्यालयात तहसीलदारांच्या दालनात आग लागल्याची घटना घडली. ही आग दालनातील एसीमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचे सांगितले जाते आहे. तहसीलदार दालनात असताना लागलीच लक्षात आल्याने सर्वेजण सुखरूप बाहेर निघाले. कार्यलयातील अग्निशामक सिलिंडरच्या सहाय्याने आग विझवल्याने दुर्घटना टळली. यात खिडकीच्या काचा फुटल्या असून पडदे आणि फर्निचरचे नुकसान झाले आहे.

आष्टी तहसीलदारांच्या दालनाला लागलेली आग

आष्टी तहसीलमध्ये सकाळी कामकाज सुरू होते. दोन दिवसांपूर्वी एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आला. यामुळे दोन दिवसांपासून कार्यालय बंद होते. आज सकाळी नियमितपणे कामकाज सुरू झाले होते आणि त्याचवेळी अचानक आग लागल्याच्या घटनेने खळबळ उडाली. यावेळी तहसीलदार आशिष वानखडे यांच्यासह आरोग्य अधिकारी आणि काही कर्मचारी दालनात होते. अचानकपणे एसीमधून शॉर्ट सर्किट झाले. यामुळे धूर निघत आल्याचे लक्षात येताच सर्व दालनाबाहेर पडले. यावेळी वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांना माहिती दिली असता तात्काळ पुढील धोका टाळण्यासाठी विद्युत पुरवठा बंद करण्याच्या सूचना तहसीलदार वानखडे यांनी दिल्या. सोबतच पोलीस आणि अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. यावेळी तहसील कार्यलयातील अग्निशामक सिलिंडरच्या साह्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. सुदैवाने यात कोणाला दुखापत झाली नाही. यावेळी खिडकीच्या काचा फुटल्या, पडदे जळाले, फर्निचरचे काही प्रमाणात नुकसान झाले असल्याची माहिती तहसीलदार आशिष वानखडे यांनी ईटीव्ही भारतला दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.