वर्धा - हिंगणघाट तालुक्यात वर्धाअतिवृष्टीहोऊन मोठं नुकसान झाले आहे. अनेकांनाच्या घरात पाणी शिरल्याने त्यांना स्थलांतरित करण्यात आले. याच महाकाली नगर भागात पूरपरिस्थितीची पाहणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंगणघाट ( Hinganghat Taluka ) येथील दौरा करून केली. तसेच हिंगणघाट येथील मोहता शाळेत स्थलांतरित करण्यात आलेल्या पूरग्रस्तांशी त्यांनी जमिनीवर बसून संवाद साधला त्यांच दुःख त्यांच्या भावना जाणून घेतल्या. यावेळी त्यांच्यासोबत खासदार रामदास तडस, आमदर समीर कुणावर, भाजपचे जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, माजी आमदार राजू तिमांडे, यासह प्रशासकीय अधिकारी उपस्थित आहे.
वर्धा जिल्ह्यात दोन दिवस झालेल्या संततधार पावसामुळे ( Heavy rain Wardha) वणा नदीला पुर येऊन ( Flooding of Vana river ) शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. तर येथील नागरिकांची शहरातील जी.बी.एम.एम.हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे निवास व भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. त्याठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis )यांनी भेट देऊन अतिवृष्टीग्रस्तांशी जमिनीवर बसून संवाद साधला व नुकसानग्रस्तांच्या समस्या जाणून घेतल्या.
या पुर्वी दुबार पेरणी सुद्धा संकटात - राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे. मात्र राज्य सरकार शेतकऱ्यांना योग्य ती मदत करेल असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते.19 जुलै रोजी वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर या गावात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचा आढावा घेत होते.
वर्धा जिल्ह्यासह चंद्रपूर, अमरावती, अकोल्यासह विदर्भ आणि मराठवाड्यात जोरदार पाऊस झाला आहे. यामुळे मराठवाड्यासह विदर्भातील शेतकऱ्यांची दुबार पेरणीही संकटात सापडली आहे. दुबार पेरणी संकटात सापडल्याने शेतकऱ्यांवर पुन्हा संकट कोसळले आहे.19 जुलै रोजी समुद्रपूर परिसरात देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी दौरा केला होता. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीही संकटात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच शेतकऱ्यांना योग्य ती मदत दिली जाईल असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले होते.