ETV Bharat / state

दिव्यांग असतानाही रोहित तिवारीने मिळविले 'नेत्रदिपक' यश, शिक्षक होण्याची व्यक्त केली इच्छा

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यालयात १० वीच्या वर्गातील रोहित तिवारी या दिव्यांग विद्यार्थ्याने दहावीच्या परिक्षेत ७१.२० टक्के गुण मिळवले. त्याच्या या यशाचे कौतुक सर्वत्र होत आहे.

author img

By

Published : Jun 10, 2019, 2:38 PM IST

Updated : Jun 10, 2019, 8:41 PM IST

दिव्यांग असतानाही रोहित तिवारीने मिळविले 'नेत्रदिपक' यश

वर्धा - समाजात आजही दिव्यांग म्हटले की त्याच्या शारीरिक कमजोरीचा बाऊ केला जातो. हसत खिल्ली उडवले जाते, हिनवले जाते. मात्र, याला खचून न जाता जिद्दीची धार देत खडतर आयुष्यातून मार्ग काढला आहे, रोहित या मुलाने. चक्षु नसताना डोळे दिपवणारे यश १० वीच्या परीक्षेत रोहितने मिळवले. ७१.२० टक्के गुण मिळवत त्याने दिव्यांगत्वाला मागे टाकला आहे.

दिव्यांग असतानाही रोहित तिवारीने मिळविले 'नेत्रदिपक' यश, शिक्षक होण्याची व्यक्त केली इच्छा

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यालयात १० वीच्या वर्गातील रोहित तिवारीचा निकाल आला. या निकालात त्याला ७१.२० टक्के गुण मिळाले. त्याच्या या यशाचे कौतुक होत आहे. त्याला पेढे भरवले जात आहे. पुष्पगुच्छ देऊन स्वागत होत आहे. पण त्याच्या बुद्धीचा प्रकाश आज दिसत असला तरी आयुष्याच्या अंधारात अनेक रात्र रोहित आणि आईने जागून काढले आहे.

रोहितला हे यश मिळवणे तेवढेच कठीण आणि खडतर होते. कारण त्याच्यासमोर होते केवळ पांढऱ्या कागदावरील ब्रेल लिपी. परंतु, त्याने हे सर्व काही शिकून घेतले. पुस्तक कुठल्याही विषयाचे असो. रोहितचे बोट त्याचे डोळे झाले. त्याच्या बोटांनी एकदा स्पर्श केला की तो वाचायला सुरुवात करतो. कुठलाही शिकवणीचा आधार न घेता त्याने यश संपादन केले. त्याला मराठीत ६८ गुण आहेत. तर ज्या इंग्रजीची अनेकांना भीती वाटते त्या विषयात त्याने ७१ गुण मिळवले.

रोहितच्या या यशात त्याच्या आईचा मोठा वाटा आहे. कारण रोहितच्या आईसोबत शिक्षक होण्याचा भार त्यांनी उचललाय. ममता तिवारी यांचे केवळ ६ वी पर्यंतच शिक्षण झाले आहे. पण मुलांसाठी त्यांनी सगळे शिकून घेतले. एवढेच काय ब्रेल लिपी शिकून घेत त्याचा अभ्यासही ते घेतात आणि शिकवतात. लहान असताना आई त्याचा पाठीमागे सावलीसारखी राहायची. शाळेत दिवसभर त्याचसोबत असायची. शाळेत स्वतः शिकत आणि घरी येऊन रोहितला शिकवत असे. हे फळ अनेक वर्षांच्या तपश्चर्येतून आले आहे.

रोहितचे ५ वी ते ७ वी पर्यंतचे शिक्षण मुंबईतल्या शाळेत झाले. हे दोन वर्ष त्याचासाठी खडतर राहिले. पण यातूनच त्याला अभ्यासाची जिद्द मिळाली. इथे त्याला वेडा म्हणून हिनवले गेले. पण तो रडत हताश होऊन न बसता ते विसरून जिद्दीने लढाईला सुरुवात केली. दिवस रात्र एक करत सर्वसामान्य शाळेत शिकून गुण मिळवले. त्याला ९० टक्के मिळेल अशी आशा होती. पण ७१.२० टक्के गुण मिळाल्याचे तो सांगतो. आता त्याला शिक्षक बनवून इतरांना शिकवायचे आहे. त्याला वेडा म्हणणाऱ्यांना दाखवून द्यायचे आहे, असे रोहित आवर्जून सांगतो.

रोहितला जरी चक्षु नसले तरी त्याला तल्लख बुद्धी आणि सरस्वतीचा आशीर्वाद लाभला आहे. तो उत्तम गाणे म्हणतो. लता मंगेशकर त्याच्या आवडत्या गायिका आहेत. तो तबलासुद्धा वाजवतो. घरात काय शिजलं हे केवळ तो त्याच्या इंद्रियांच्या साहाय्याने सांगतो. तसेच रोहितला भ्रमंती करायलाही आवडते. त्यामुळे सुट्ट्यांमध्ये तो आई-वडिलांसोबत फिरायला जातो.

ऑटोरिक्षा चालवतात रोहितचे वडील ....

रोहितचे वडील गणेश तिवारी हे ऑटोरिक्षा चालावतात. सेवाभाव आणि भावना समजून घेत दिव्यांग मुलांना नाममात्र शुल्क घेत शाळेतून घरी आणि घरून शाळेत सोडतात. यानंतर ते रोजीरोजीसाठी ऑटोरिक्षा चालवत संसाराचा गाढा हाकतात. मात्र, रोहितच्या यशाचे श्रेय ते रोहितच्या आई ममता यांनाच देतात.

रोहितला शासकीय यंत्रणेकडून मदत मिळवून देणे असो की त्याला लागणाऱ्या ऑडिओ बुक या सगळ्यासाठी त्याला डायट संलग्नित जिल्हा समन्वयक समावेशीत शिक्षक प्रवीण गौतम यांची मोलाची मदत मिळाली. तसेच दिव्यांग म्हटले की अडचणी आल्याच. यावर मात करायला शाळेच्या शिक्षकांसह त्याला डायटच्या विषय तज्ञ किरण वांडरे, गजानन वैद्य मनीष जगताप यांचीही मदत मिळाली.

परिक्षेत अनेकजण हताश होत कमी गुण मिळल्याने टोकाची भूमिका घेतात. परंतु, रोहितने त्याच्या दिव्यांगत्वावर हसणाऱ्यांना अभ्यास करून चपराक दिली आहे.

Intro:mh_war_divyang_rohit_vis1, vis2_7204321

mh_war_divyang_rohit_b1, b2_7204321

व्हिजवल भरपूर आहे, pkg स्टोरीसाठी विचाराधीन आहे. Pls बातमीला चांगला न्याय मिळेल.

मला पागल म्हणायचे....पण मी शिक्षक होणार - रोहित तिवारी....

समाजात आजही दिव्यांग म्हटलं की त्याचा शारीरिक कमजोरीचा बाऊ केला जातो. हासत खिल्ली उडवल्या जाते... हिनवले जाते. मात्र खचून न जाता यालाच जिद्दीची धार देत खडतर आयुष्यातून मार्ग काढला. चक्षु नसतांना डोळे दिपवणारं यश 10वीच्या परीक्षेत रोहितन मिळवलंय. 71.20 टक्के गुण मिळवत दिव्यांगत्वाला मागे टाकत अव्वल आला.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यालयात 10 व्या वर्गातील रोहितचा निकाल आला. रोहितच्या यशाचे कौतुक होत आहे. त्याला पेढे भरवले जात आहे. पुष्पगुच्छ देऊन स्वागत होत आहे. पण त्याचा बुद्धीचा प्रकाश आज दिसत असला तरी आयुष्याच्या अंधारात अनेक रात्र रोहित आणि आईने जागून काढत हे यश मिळवले आहे.

हे यश रोहितला मिळवणे तेवढेच कठीण आणि खडतर आहे. जेवढी ब्रेललिपी.... ब्रेललिपी...ना रंग... ना अक्षर.. ना चित्र...इथे असते फक्त पांढऱ्या कागदावरील ब्रेल लिपी.... त्याचा बोटाला स्पर्श होताच डोळ्याने वाचल्यागत बोलणारी लिपी... पुस्तक कुठल्याही विषयाचे असो... रोहितचे बोट त्याचे डोळे झाले... त्याचा बोटांनी एकदाका स्पर्श केला... तो वाचायला सुरुवात करतो. कुठलाही ट्युशनचा आधार न घेता यश संपादन केले. त्याला मराठीत 68 मार्क आहे. तर ज्या इंग्रजीची अनेकांना भीती वाटते त्या विषयात 71 मार्क मिळवले.

रोहितच्या या यशात त्याचा आईचा मोठा वाटा आहे. कारण रोहितच्या आईसोबत शिक्षक होण्याचा भार उचललाय. ममता तिवारी यांचे शिक्षण केवळ 6 वा वर्ग झाले आहे. पण मुलांसाठी त्यांनी सगळं शिकून घेतलं. एवढंच काय ब्रेल लिपी शिकून घेत त्याचा अभ्यासही घेतात आणि शिकवतात. लहान असतांना आई त्याचा पाठीमागे सावलीसारखी राहायची शाळेत दिवसभर त्याचसोबत असायची. शाळेत स्वतः शिकत आणि घरी येऊन रोहितला शिकवत असे हे फळ अनेक वर्षांच्या तपश्चर्येतून आले आहे.

रोहित वर्ग 5 ते 7 मुंबईतल्या शाळेत शिकायला होता. हे दोन वर्ष त्याचासाठी खडतर राहिले. पण यातूनच त्याला अभ्यासाची जिद्द मिळाली. ईथे त्याला पागल म्हणून हिनवल्या गेले...पण तो ते विसरून किंवा रडत हताश झाला नाही. इथून त्याने जिद्दीने लढाईला सुरवात केली. दिवस रात्र एक करत सर्वसामान्य शाळेत शिकून गुण मिळवले. त्याला 90 टक्के मिळेल अशी आशा होती. पण 71.20 टक्के गुण मिळल्याचे सांगतो. आता त्याला शिक्षक बनवून इतरांना शिकवायचे आहे. त्याला पागल म्हणवणाऱ्या दाखवून द्यायचे आहे अस रोहित आवर्जून सांगतो.

रोहितला जरी चक्षु नसले तरी त्याला तल्लख बुद्धी आणि सरस्वतीचा आशीर्वाद लाभलाय. तो उत्तम गाणे म्हणतो...लता मंगेशकर त्याचा आवडत्या गायिका आहे. तो तबला सुद्धा वाजवतो. घरात काय शिजल हे केवळ हे त्याचा इंद्रियांच्या साह्याने सांगतो. रोहितला भ्रमंती करायला आवडते. त्यामुळे सुट्ट्यांमध्ये तो आई वडिलांसोबत फिरताला जातो. गेल्या काही वर्षात प्रवास करताना लागलेल्या स्टेशनचे नाव मुखोद्गत झाले आहे.

रोहितचे वडील हे ऑटोरिक्षा चालवतात....
रोहितचे वडील गणेश तिवारी हे ऑटोरिक्षा चालावता. सेवा भाव आणि भावना समजून घेत दिव्यांग मुलांना नाममात्र शुल्क घेत शाळेतून घरी आणि घरून शाळेत सोडून देतात. या नंतर ते रोजीरोजीसाठी ऑटिरिक्षा चालवत संसाराचा गाढा हाकतात. मात्र रोहितच्या यशाचे श्रेय त्याला आणि आई ममता यांनाच देतात.

रोहितला शासकीय यंत्रणेकडून मदत मिळवून देणे असो की पुस्तकांचा विषय... त्याला लागणाऱ्या ऑडिओ बुक सगळं काही अडचणींवर मात केली. यासाठी त्याला मोलाची मदत मिळते ती डायट संलग्नित जिल्हा समन्वयक समावेशीत शिक्षक प्रवीण गौतम यांची. दिव्यांग म्हटले की अडचणी आल्याच आणि यावर मात करायला शाळेच्या शिक्षकांसह डायटच्या विषय तज्ञ
किरण वांडरे, गजानन वैद्य मनीष जगताप याचा लाडका झाला आहे.

अनेकजण हाताश होत कमी गुण मिळल्याने टोकाची भूमिका घेतात. पण रोहितने दिव्यांत्वावर हसणाऱ्यांना अभ्यास करून चपराक दिली आहे. Body:पराग ढोबळे,वर्धा.Conclusion:
Last Updated : Jun 10, 2019, 8:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.