ETV Bharat / state

युवासेना विस्तारक राहुल लोंढेंनी ठाणे पालिकेला उपलब्ध करून दिला ऑक्सिजन - ठाणे महापालिका कोरोना न्यूज

वाढत्या कोरोना रूग्णसंख्येमुळे सर्वत्र चिंताजनक परिस्थिती आहे. त्यातच बेड, ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. ठाण्यातही हिच परिस्थिती आहे. त्यामुळे युवासेना विस्तारक राहुल लोंढे यांनी रायगडच्या एका कंपनीकडून ठाणे पालिकेला मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध करून दिला आहे. त्याचप्रमाणे मीरा-भाईंदर महानगरपालिकेला देखील त्यांनी अशा प्रकारची मदत केलेली आहे. त्यामुळे अनेक रुग्णांचा जीव वाचला आहे.

thane
ठाणे
author img

By

Published : Apr 29, 2021, 3:51 PM IST

ठाणे - वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता सर्वत्र हाहाकार माजला आहे. त्यात कोरोना रुग्ण वाढल्याने हॉस्पिटलमध्ये बेड, ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडादेखील जाणवत आहे. ठाण्यातही ऑक्सिजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. अशातच युवासेना विस्तारक राहुल लोंढे यांनी रायगडच्या एका कंपनीकडून ठाणे पालिकेला मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध करून दिला आहे. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ठाण्याला ऑक्सिजनचा पुरवठा मिळवण्यासाठी सर्वत्र प्रयत्न सुरू होते. त्यानंतर राहुल लोंढे यांनी रायगड येथून ठाणे महानगरपालिकेतील हॉस्पिटलला ऑक्सिजन मिळवून दिले. त्यामुळे अनेक रुग्णांचा जीव वाचला आहे. त्याचप्रमाणे मीरा-भाईंदर महानगरपालिकेलादेखील त्यांनी अशा प्रकारची मदत केलेली आहे.

युवासेना विस्तारक राहुल लोंढेंनी ठाणे पालिकेला उपलब्ध करून दिला ऑक्सिजन

'कोरोना रुग्णांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडत आहे. सकाळी 8 ते रात्री 2 वाजेपर्यंत फोन वाजत असतो. पहिले इंजेक्शन, बेडसाठी फोन यायचे, आता ऑक्सिजनसाठी फोन येतात. काही वेळा खाजगी रुग्णालये अत्यंत शेवटच्या क्षणाला ऑक्सिजनसाठी फोन करतात. 10 तास आधी जिल्हा प्रशासनाशी संपर्क करून तुमच्याकडील साठ्याची माहिती द्या, म्हणजे ऑक्सिजनचा साठा पुरवता येईल, अशा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालय प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. पंरतु जेव्हा रुग्णाला ऑक्सिजन मिळत नाही तेव्हा वाईट वाटते', अशी खंत राहुल लोंढे यांनी व्यक्त केली. प्रमाणिक प्रयत्न करत ऑक्सिजनचा पुरवठा करत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे, असेही राहुल लोंढेंनी म्हटले.

अडिचशे टक्के ऑक्सिजन महागला

कोरोना रूग्णांची संख्या वाढल्यामुळे ऑक्सिजनच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. जवळपास अडिचशे टक्के किंमतीमध्ये वाढ झालेली आहे. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना या दरवाढीचा फटका बसतोय. यासाठीही सरकारने उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे गॅस उत्पादकांचे म्हणणे आहे.

हेही वाचा - दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : वन अधिकारी रेड्डीला अखेर नागपुरातून अटक

हेही वाचा -आळंदी पोलिसांच्या आव्हानाला चारशे पेक्षा अधिक रक्तदात्यांची साथ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.