ठाणे : मध्य रेल्वेच्या कल्याण कसारा मार्गावरील आंबिवली रेल्वे स्थानकातील प्लाँटफार्मवर (woman gave birth on plant farm) आज दुपारच्या सुमारास एका गरोदर महिलेने गोडंस मुलीला जन्म दिल्याची घटना घडली. विशेष म्हणजे प्लाँटफार्म वरील प्रवाशी महिला आणि लोहमार्ग महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी या महिलेची सुखरूप प्रस्तुती केल्याने मातेसह बाळ सुखरुप (girl is born) असल्याचे सांगण्यात आले. प्रमिला गणेश मुकणे (वय २३) असे नवजात मुलीला जन्म (Child Birth On Railway Station ) देणाऱ्या आईचे नाव आहे.
महिला पोलीस धावल्या मदतीला : आंबिवली रेल्वे स्थानकातील प्लाँटफार्म नं १ वर आसनगाव लोकलने शहापूर येथे जाण्यासाठी प्रमिला मुकणे ह्या आपल्या आई आणि भावजीसह आज दुपारी १.१५ वा. सुमारास प्रवासाला निघाली होती. त्याच सुमारास तिला प्रस्तुती वेदना सुरु झाल्याने तातडीने जीआरपी पथकातील महिला कँन्स्टेबल रितु कुमारी आणि एएसआय प्रकाश बागुल यांनी घटनास्थळी धाव घेत, काही महिला प्रवाशीच्या मदतीने फलाटावरच बाळतंपण केले.
बाळाचा सुखरूप जन्म : प्रमिला गणेश मुकणे यांनी गोडंस मुलीला जन्म दिला. तर उपस्थित प्रवाशी महिलावर्गाने आंनदाने सुटकेचा निश्वास टाकला.